You are currently viewing डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्याचा वजन काटा बिनचूक

डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्याचा वजन काटा बिनचूक

वैधमापन समितीने अचानक भेट देत केली खात्री

वैभववाडी

येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वजनकाट्यांची वैधमापन विभागाने अचानक तपासणी केली असता हा काटा बिनचूक असल्याचे स्पष्ट झाले. वजनकाटा बिनचूक व बरोबर असल्याचा अहवाल वैधमापनच्या भरारी पथकाने कारखाना प्रशासनाला दिला.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार भरारी पथकाने केलेल्या तपासणीत निरीक्षक वैधमापनशास्त्र, कोल्हापूर 3 रा विभाग कोल्हापूरचे वि. व्यं. कासले, उपनियंत्रक रा. ना. गायकवाड, द्वितीय विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (साखर) कोल्हापूरचे संजय बाबुराव कोळी, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी ज्ञानदेव आण्णा पाटील, गगनबावडा पोलिस ठाण्याचे प्रतिनिधी विजय ठाकूर, गगनबावडा तहसिलदार यांचे प्रतिनिधी रियाज रेठरेकर यांचा समावेश होता.
कारखान्याचे चिफ इंजिनिअर बाजीराव पाटील व केनयार्ड सुपरवायझर शरद कोटकर यांच्यासह अन्य साक्षीदारांच्या समोर ही काटा तपासणी झाली. यावेळी भरारी पथकाने वजन काट्यावरुन वजन करुन गव्हाणीजवळ गेलेल्या 4 वाहनांना परत बोलवण्याची सुचना वैधमापन निरीक्षक वि. व्यं. कासले यांनी केनयार्ड सुपरवायझर यांना केली. त्यानुसार ही वाहने परत वजन काट्यावरती बोलावून घेऊन सदरची वाहने ज्या वजन काटयावर वजन करुन गव्हाणीवर गेली होती, त्याच वजन काट्यावर फेरवजन करुन पडताळणी करण्यात आली. ही वजने बरोबर असल्याचे दिसून आले. भरारी पथकाने वजनकाटे योग्य व बरोबर असल्याचा अहवाल कारखान्याचे सेक्रेटरी नंदकुमार पाटील यांना दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − two =