धोनीचा अजरामर सिक्स, सचिनचे अश्रू आणि कधीही न विसरता येणारी ‘ती’ रात्र

धोनीचा अजरामर सिक्स, सचिनचे अश्रू आणि कधीही न विसरता येणारी ‘ती’ रात्र

मुंबई

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 2 एप्रिल हा दिवस खास आहे. आजच्या दिवशी 2011 साली (On This Day ) भारताने दुसऱ्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. कपिल देवच्या टीमनं 1983 साली केलेल्या कामगिरीनंतर तब्बल 28 वर्षांनी भारतीय कॅप्टननं वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाचा तेंव्हाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याने सिक्स लगावत भारताच्या वर्ल्ड कप विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. धोनीचा तो अजरामर सिक्स, त्यानंतरच्या मिरवणुकीच्या दरम्यान सचिन तेंडुलकरचे अश्रू आणि संपूर्ण देशानं केलेला जल्लोष आज 10 वर्षांनी देखील सर्वांच्या लक्षात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा