You are currently viewing रुग्ण सेवा ही जगातील सर्वात श्रेष्ठ सेवा आहे”: अलका नवलकर

रुग्ण सेवा ही जगातील सर्वात श्रेष्ठ सेवा आहे”: अलका नवलकर

कुडाळ

“रुग्णसेवा ही जगातील सर्वात श्रेष्ठ सेवा आहे ,याची तोड जगात अजून कशालाच नाही आणि यासेवेतूनच आयुष्याचे सार्थक होते. ज्ञानवंत प्रामाणिकपणाने तुमच्या कार्याला न्याय द्या ,यश तुमचेच आहे.”अशा शब्दात सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबईच्या निवृत्त अधिपरिचारिका सौ अलका नवलकर यांनी काढले.त्या कुडाळ येथील बॅ.नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमीच्या जी.एन.एम अभ्यासक्रमाची 11वी बॅच आणि ए. एन. एम. अभ्यासक्रमाच्या 13 व्या बॅचमधील विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या शपथविधी समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या .
“आपण कुणाच्या संगतीत राहतो आणि कुणाच्या पंक्तीत बसतो यावर आपल्या आयुष्याची दिशा अवलंबून असते, त्यामुळे नेहमी निर्णय घेताना, माणसं निवडताना बुद्धीचा वापर करा. असेही त्या आपल्या पुढील मनोगतांमध्ये म्हणाल्या. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून के. इ.एम हॉस्पिटल मुंबईच्या निवृत्त अधिपरिचारिका सौ. वैशाली गावडे ,बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. उमेश गाळवणकर, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ .अमृता गाळवणकर, बॅ नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमी कुडाळच्या प्राचार्य सौ. मीना जोशी , उपप्राचार्य सौ.कल्पना भंडारी, बॅ . नाथ पै सीनियर कॉलेज प्राचार्य श्री. अरुण मर्गज, बॅ नाथ पै बी एड कॉलेज प्राचार्य श्री. परेश धावडे ,बॅ नाथ पै ज्युनिअर कॉलेज प्राचार्य श्री. अर्जुन सतोस्कर उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून व नाइटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरू झालेल्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलताना नर्सिंग महाविद्यालयाच्या पहिल्या प्राचार्य तथा तथा के एम हॉस्पिटल मुंबईच्या निवृत्त अधिपरिचारिका सौ.वैशाली गावडे यांनी आपल्या मनोगतामध्ये “परिचर्या हे क्षेत्र संधी म्हणून बघू नका तर ती आवड म्हणून निवडा तरच चांगल्या प्रकारचे काम तुमच्या हातून होईल ,कारण सगळ्या चुका बदलता येतात; पण परिचारिका म्हणून केलेली एक चूक ही एखाद्याच आयुष्य संपवू शकते. म्हणून भानावर राहून काम करा. निरपेक्ष राहून सेवा करा .तरच आयुष्यात सार्वाधिक समाधान मिळेल “असे प्रतिपादन केले .
या कार्यक्रमादरम्यान संस्था अध्यक्ष श्री .उमेश वाळवणकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. “नर्सिंग हे व्रत आहे ते अर्ध्यावर सोडता येत नाही त्यामुळे आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी चिकाटीने काम करा .यश तुमचेच आहे. एखाद्याला जीवनदान देण्या एवढा मोलाचं कार्य या जगात दुसरं असूच शकत नाही. आणि याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही” अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
“आपण मनापासून केलेली सेवा मग ती कुठल्याही प्रकारची असो ती ईश्वराप्रति समर्पित करा.तिच खरी ईश्वर सेवा आहे” असे उद्गार बॅ. नाथ पै कला वाणिज्य आणि विज्ञान महिला आणि रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अरुण मर्गज यांनी काढले.व शुभेच्छा दिल्या.
शपथविधीचा हा कार्यक्रम म्हणजे या क्षेत्राशी वचनबद्ध होणे आणि परिचर्या क्षेत्राशी वचनबद्ध होत असताना दिव्याच्या रूपाने हा वसा विद्यार्थी विद्यार्थिनींना दिला जातो .
कार्यक्रमाच्याअध्यक्षा सौ. अलका नवलकर व प्रमुख पाहुण्यां सौ.वैशाली गावडे यांनी हा वसा नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापिका श्रीमती प्रणाली मयेकर ,रेश्मा कोचरेकर, गौतमी माईंडकर व ऋग्वेदा राऊळ यांना दिला व त्यांनी या नवीन विद्यार्थ्यांपर्यंत पुढे पोहोचविला. या आता आवर्जून उल्लेख केला. यावेळी नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापिका सौ .वैशाली कोलगावकर यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना शपथ दिली .
या कार्यक्रमाची प्रस्तावना नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्य सौ. कल्पना भंडारी तर वार्षिक अहवाल वाचन प्राचार्य सौ. मीना जोशी यांनी केले .तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नर्सिंग प्राध्यापिका पूजा म्हालटकर व आभार प्रदर्शन प्राध्यापिका गौतमी माईंडकर यांनी केले. यावेळी या कार्यक्रमास प्राध्यापिका सौ .शांभवी मार्गी, सौ. सुमन सावंत, प्रणाली मयेकर, प्रियांका माळकर, कृतिका यादव ,प्रथमेश हरमलकर, प्रसाद कानडे ,किरण करंदीकर ,प्रज्ञा देसाई तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 8 =