You are currently viewing ई स्टोअर इंडिया गुंतवणूकदार अडचणीत; नेटवर्क मार्केटिंग चिंतेचा विषय

ई स्टोअर इंडिया गुंतवणूकदार अडचणीत; नेटवर्क मार्केटिंग चिंतेचा विषय

सिंधुदुर्ग :

 

ई स्टोअर इंडिया (वेदिका आयुर केअर) या कंपनीच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि हे सर्व काही प्रामुख्याने ई स्टोअर इंडिया कंपनीच्या काही लीडर्समुळे होत आहे. अशी माहिती ई स्टोअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. ई स्टोअर इंडियाच्या काही लीडर्सने ई स्टोअर इंडिया कंपनीचे प्रॉब्लेम सुरू असतानाच एका दुसऱ्या नेटवर्क कंपनीचे काम सुरू केल्यामुळे ई स्टोअर इंडियाच्या गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. हे काही लीडर इतर नेटवर्क मार्केटिंगमध्ये असलेल्या कंपन्यांचे काम करत ते आपल्या सर्व ई स्टोअर इंडिया कंपनीच्या लोकांना त्या नवीन कंपनीला जॉईन होण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे ई स्टोअर इंडिया ला खूपच प्रॉब्लेम होऊ शकतात. तसेच अशा काही लोकांनी वेळोवेळी वेगवेगळ्या कंपन्या बदलत असल्यामुळे नेटवर्क मार्केटिंग बदनाम होत आहे. अशी चर्चा होत आहे. ई स्टोअर इंडिया ही गेल्या पाच वर्षातली नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कंपनी ठरलेली आहे. परंतु गेल्या एक वर्षापासून या कंपनीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आणि गेल्या सहा महिन्यांपासून या समस्यांमध्ये अधिकच वाढ झाली आहे. काही व्यक्तींनी चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे आणि स्वतः पैसे कमवण्यासाठी कंपनीबद्दल चुकीची माहिती देऊन गुंतवणूकदार घेतल्यामुळे या कंपनीला मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. तसेच मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशी प्रतिक्रिया ई स्टोअर इंडिया कंपनीचे महाराष्ट्र – गोवा प्रमोटर शैलेंद्र पेडणेकर यांनी दिली आहे. ज्या व्यक्तींनी ई स्टोअर इंडिया कंपनीच्या माध्यमातून लाखो -करोडो रुपये कमवले तेच कंपनीची जबाबदारी नाकारत आहेत. तसेच महत्त्वाचे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही व्यक्ती जे अनेक नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्या बदलत चुकीच्या पद्धतीने काम करत सामान्य लोकांना लुबाडत आहेत, हेच व्यक्ती ई स्टोअर इंडिया कंपनीत जॉईन झाल्यामुळेच या समस्या निर्माण झाल्या अशी प्रतिक्रिया कंपनीचे महाराष्ट्र – गोवा प्रमोटर शैलेंद्र पेडणेकर यांनी दिली आहे. ई स्टोअर इंडिया ही एक सुरळीत चालणारी कंपनी आणि लोकांचे करिअर बनवणारी कंपनी आहे. परंतु यापूर्वी नेटवर्क मार्केटिंग मध्ये बदनाम असलेले आणि अनेक कंपन्या सोडून वेगवेगळ्या कंपन्या पकडून त्या कंपन्या बंद पाडण्याचे काम करणारे काही व्यक्ती ई स्टोअर इंडिया या कंपनीमध्ये आल्यामुळेच या कंपनीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशी माहिती कंपनीच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. असे अनेक व्यक्ती जे वेळोवेळी वेगवेगळ्या कंपन्या बदलून वेगवेगळे प्लॅन घेऊन लोकांकडे जातात, त्यांना टार्गेट न करता जाणून-बुजून या लोकांकडे दुर्लक्ष करून योग्य पद्धतीने काम करणाऱ्या लोकांना टार्गेट केलं जातं आहे. अशीही माहिती त्यांनी दिली आहे. अशाच पद्धतीने कंपनीचे करोडपती बनलेले लीडर जर यापुढे वागत असतील तर ही कंपनी चालवणं हे फार अवघड आहे. या कंपनीद्वारे करोडपती बनलेले लिडरच जर आज हीच कंपनी सोडून दुसरी कंपनी जॉईन करून दुसऱ्या कंपनीचे काम करत आहेत आणि नवीन कंपनी घेऊन लोकांकडे जात आहेत तर सहाजिकच या ई स्टोअर इंडिया ( वेदिक आयुर केअर) या कंपनीला काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पुढे काय करावे? नेमकी या कंपनीची जबाबदारी कोणी घ्यावी? ह्या कंपनीची जबाबदारी एकट्याने का घ्यावी? असे असे प्रश्न या कंपनीच्या काही पदाधिकाऱ्यांनी केले आहेत.

त्यातच सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनीची वरिष्ठ महिला पदाधिकारी संजना परांजपे ही गेल्या तीन महिन्यापासून नॉट रिचेबल आहे. संजना परांजपे वेळोवेळी महिलांमधून करोडपती झालेली एक महिला म्हणून समोर येत होती आणि महिलांना या कंपनीमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन देत होती. त्यानुसार अनेक महिला संचना परांजपे या महिलेच्या सांगण्यावरूनच या कंपनीला जॉईन झाल्या होत्या. अशीही माहिती मिळत आहे. पण ऐनवेळी संजना परांजपे ही फोन बंद करून गायब असल्यामुळे कंपनीच्या महिला गुंतवणूकदार आणि काही महिला लीडर्स यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संजना परांजपे ही नेमकी कोणत्या कारणामुळे गायब आहे. हे कारण अपष्ट आहे. संजना परांजपे या महिलेने ई स्टोअर इंडिया (वेदिक आयुर केअर) या कंपनीमार्फत करोड रुपये कमवल्याची कबुली दिली आहे. वेळोवेळी ई स्टोअर कंपनीच्या होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये संजना परांजपे या महिलेने करोडपती असल्याचा अर्थात करोड रुपये कमवण्याची माहिती देत असतानाचे व्हिडिओही आहेत. असं समजतं. याचा अर्थ ई स्टोअर इंडिया या कंपनीच्या कामकाजाची संपूर्ण माहिती संजना परांजपे यांना आहे. संजना परांजपे यांनी सध्याच्या परिस्थितीत कंपनी बाबत योग्य ती भूमिका महिलांसमोर मांडणे गरजेचे आहे. असे अनेक लोकांचे म्हणणे आहे. परंतु तसे काही होत नसताना दिसत आहे. लवकरात लवकर संजना परांजपेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन योग्य ती भूमिका कंपनीची आयडी धारकांसमोर आणि गुंतवणूकदारांसमोर मांडली नाही तर संजनापरांजपे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी ही माहिती ई स्टोअर इंडियाच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 5 =