You are currently viewing सवंग लोकप्रियतेसाठी अतुल बंगे चा दिखाऊपणा

सवंग लोकप्रियतेसाठी अतुल बंगे चा दिखाऊपणा

 -कुणाल किनळेकर, जिल्हाध्यक्ष मनविसे.

मा‌. जिल्हाधिकार्‍यांकडे नवीन रक्त तपासणी मशीन ची मागणी करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी प्रथम यापूर्वीही अनेकदा मनसेनेच आठवण करून दिलेली अनेक वर्षापासून जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी वापराविना पडून असलेली अत्याधुनिक रक्त तपासणी मशीन वापरात आणल्यास जनतेचा पैसा व वेळ दोन्हीही वाचतील. त्याचप्रमाणे गेल्या सात वर्षापासून बांधून पूर्ण झालेले महिला व बाल रुग्णालय आज पूर्ण क्षमतेने चालू झाले असते तर किमान ४०० रुग्णांना याचा लाभ मिळाला असता.अजुनही वेळ गेलेली नाही कुडाळ मधील हे महिला बाल रुग्णालय सुरू होण्यासाठी खरंच काही निधी मिळतो का बघावं.
आपले आमदार ,खासदार आणि पालकमंत्री आणि आपण जाहीर करता की कोट्यावधीचा निधी रस्ते विकासासाठी आला तो प्रत्यक्षात आला की नुसताच कागदावर तेही कागदोपत्री जाहीर करावे. आणि खरच कोट्यावधीचा निधी रस्ते विकासासाठी आला असेल तर मग सध्याची गरज आणि प्राथमिकता असलेल्या आरोग्य सुविधा यासाठी निधीची कमतरता का.
गेल्या वर्षभरापूर्वी मोठा गाजावाजा आणि स्टंटबाजी करून आपण प्रांत कार्यालयातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा जो दिखावा केलात आणि एका परप्रांतीय व्यापाऱ्याला फुकटचे लाखो रुपये मिळवून दिलात त्या परमार प्रकरणाचं पुढे काय झालं.
नुसती रस्त्यांच्या निधीची घोषणा करता आणि श्रेय घेता मग जिल्ह्यात सुमारे साडे चारशे लोक कोरोनाच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे मृत्युमुखी पडले ते पण अपयश आपल्या नेत्यांनाच जाते.असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी विचारला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 2 =