You are currently viewing पॉलिटेक्निक व डी.फार्मसी प्रवेशाला 10 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ…

पॉलिटेक्निक व डी.फार्मसी प्रवेशाला 10 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ…

राज्यातील दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज भरणे आणि पडताळणी करण्याची मुदत 10 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाकडून दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका तसेच बारावीनंतरच्या औषध निर्माण शास्त्र, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अशा डिप्लोमा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 10 ऑगस्टपासून राबवण्यात येत आहे. सुरुवातीला अर्ज भरण्यासाठी 25 ऑगस्ट अंतिम मुदत होती. त्यानंतर ती 4 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र करोना संसर्गाच्या काळात विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक कागदपत्रे तसेच विविध दाखले मिळवण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळे राखीव प्रवर्गातून अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. याकरिताच ही प्रक्रिया 10 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे.
सुधारित परिपत्रकानुसार तात्पुरती गुणवत्ता यादी 13 सप्टेंबरला जाहीर होणार असून त्याबाबतचे आक्षेप 16 सप्टेंबरपर्यंत नोंदवता येतील. त्यानंतर 18 सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
शैक्षणिक संस्थांच्या कोट्यातील राखीव जागांसाठी अर्ज भरणे ते प्रवेश निश्चित करण्यापर्यंत ही प्रक्रिया कट ऑफ डेट पर्यंत सुरू राहणार आहे. 10 सप्टेंबरनंतर पडताळणी होऊन हे अर्ज संस्था स्तरावरील तसेच प्रवेश प्रक्रियेत रिक्त जागांसाठी ग्राह्य धरले जातील.
अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी जवळच्या प्रवेश सुविधा केंद्रावर किंवा www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर माहिती घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =