You are currently viewing काय ह्यो श्रावण!

काय ह्यो श्रावण!

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक ज्येष्ठ मालवणी साहित्यिक श्री विनय सौदागर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*काय ह्यो श्रावण!*

 

काय ह्यो श्रावण तरी

माश्यार मन्छा नाय

आटावड्यात चार दिस

देवळाकडे पाय

 

काय ह्यो श्रावण तरी

भजनाक येता ऊत

रोज किलेस करणारोय

झालोहा सरळ सूत

 

काय ह्यो श्रावण तरी

डाळभाताक चव

गोडसाण बरी भुरकतय

तुया बग्गीत रव

 

काय ह्यो श्रावण तरी

न्हिबरा बरोबर पाव्स

फूला सोदता बापूस आणि

सवळ्यात रमता आव्स

 

काय ह्यो श्रावण तरी

चिबडा बेगीन पिकली

गळोभर मंगळसूत्रा

कप्पाळभर टिकली

 

काय ह्यो श्रावण तरी

चौरंग गेले शाळेत

घर पूरा रंगताहा

अभंगांच्या माळेत

 

काय ह्यो श्रावण तरी

चाकरे तिकटा सोदतत्

हयले आणि थयले

सगळेच दिस मोदतत्

 

काय ह्यो श्रावण तरी

जो तो करता उपास

परंपरेचा वझा ओडतत

कोन्नाक नाय तरास

 

काय ह्यो श्रावण तरी

अश्शी जादू करता

कलियुगाक बाजूक सारून

सतयुगात होरता.

 

*विनय सौदागर*

आजगाव, सावंतवाडी.

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा