You are currently viewing भांडुपगाव वारकरी संप्रदाय मंडळातर्फे भव्य किर्तन महोत्सवाचे दि.११ ते १५ जानेवारीला आयोजन!

भांडुपगाव वारकरी संप्रदाय मंडळातर्फे भव्य किर्तन महोत्सवाचे दि.११ ते १५ जानेवारीला आयोजन!

*भांडुपगाव वारकरी संप्रदाय मंडळातर्फे भव्य किर्तन महोत्सवाचे दि.११ ते १५ जानेवारीला आयोजन!*

मुंबई –

सध्याच्या अस्थिर व अशांत जिवनात सुख व शांती लाभण्यासाठी तसेच कौटुंबिक व सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी देशप्रेम, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम व संस्कृती जतन व्हावी व एकात्मता नांदावी या उद्देशाने प्रतिवर्षी भांडुपगाव वारकरी संप्रदाय मंडळ (रजि ) भव्य किर्तन महोत्सव संगीत तुलसी रामायण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तपपूर्ती सोहळ्याचे दि. ११ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले असून उद्घाटन खासदार संजय राऊत, मनोज कोटक, आमदार सुनील राऊत, कामगार नेते परशुराम कोपरकर, भाऊ जगताप, माजी नगरसेविका सारिका पवार, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर यांच्या हस्ते कलश पुजन, दिप प्रज्वलन, वीणा पुजन, व्यासपीठ पुजन करण्यात येणार आहे. सदर सोहळ्याला प.पू. सद्गुरु हरिभाऊ महाराज बोराटे ( बाबासाहेब आजरेकर – फड प्रमुख, पंढरपूर) वै. सद्गुरू तुकाराम एकनाथ काळे माऊली, सद्गुरू वै. रामभाऊ महाराज डोंगळे यांच्या कुपा आशिर्वादाने पारायण नेतृत्व व्यासपीठ चालक गुरूवर्य ह.भ.प. संतोष महाराज सावरटकर (भागवताचार्य ) , काकडा नेतृत्व ह.भ.प. विनायक महाराज कुंभार, शिवाजी महाराज साळुंखे सांगली, शिवाजी महाराज मत्रे आदी महाराष्ट्रातील थोर किर्तनकाराच्या अमृतमय वाणी -द्वारे होणाऱ्या ज्ञानदानाचा लाभ घ्यावा, असे मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.विनोद महाराज शिंदे, सचिव दत्ताराम धर्मा पालेकर यांनी आवाहन केले आहे.यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला आहे. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी दिंडी सोहळा व नगर प्रदक्षिणा भांडुप परिसरातून निघणार असून उपस्थित भाविकांमधुन भाग्यवान भाविकांना एक ज्ञानेश्वरी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 7 =