रेल्वे अपघातातील मृत व्यक्ती तळवडेतील

रेल्वे अपघातातील मृत व्यक्ती तळवडेतील

नेमळे येथे शुक्रवारी झाला होता अपघात

सावंतवाडी
कोकण रेल्वे मार्गावर नेमळे येथे रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. सदर मृत व्यक्तीची ओळख पटली असून सदर व्यक्तीचे हरिश्चंद्र उर्फ हरि विठोबा मालवणकर ( ९८, रा. तळवडे म्हाळाईवाडी ) असे नाव आहे. त्यांचा पुतण्या दामोदर बाळकृष्ण मालवणकर याने त्यांच्या अंगावरील शर्ट व टॉवेलवरून त्यांची ओळख पटवली. दोन दिवसांपासून ते तळवडे येथून बेपत्ता होते. बाबतची माहिती तपासी अंमलदार महेश जाधव यांनी दिली आहे.
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नेमळे कौल कारखान्यानजिक एक अज्ञात व्यक्ती रेल्वे अपघातात मृत झाल्याची घटना उघडकीस आली होती. याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी सावंतवाडी पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा