You are currently viewing जगन्नाथ संगीत विद्यालयातील विद्यार्थ्याने केली ताल वाद्यांची अनोखी जुगलबंदी..

जगन्नाथ संगीत विद्यालयातील विद्यार्थ्याने केली ताल वाद्यांची अनोखी जुगलबंदी..

जगन्नाथ संगीत विद्यालयातील विद्यार्थ्याने केली ताल वाद्यांची अनोखी जुगलबंदी..

कुडाळ

कुडाळ येथील भैरव मंदिर मध्ये श्री जगन्नाथ संगीत विद्यालय व अष्टपैलु कलानिकेतन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने संचालक भजन रत्न श्री भालचंद्र केळुसकर बुवा व पखवाज महर्षी डॉ. दादा परब संचालित हे विद्यालय आणि या विद्यालयाचे प्रशिक्षक पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत, तसेच तबला विशारद एम ए श्री धनंजय देसाई आणि समस्त भजनी बुवा तबला पखवाज वादक व सर्व जगन्नाथ संगीत विद्यालयाचे समस्त विद्यार्थी वर्ग यांचा संगीत गुरु पूजन महोत्सवाचे रविवारी दिनांक ६ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजन केले होते.

या मध्ये शिष्यांचे गायन, तबला, पखवाज, ढोलकी वादन झाले. त्याच बरोबर गोवा येथील सौ. मुग्धा गावकर यांच्या संगीत मैफिलीने बहारदार रंगात आली.

या गुरु पूजन संगीत महोत्सवात श्रोत्यांना विशेष वाद्यांची जुगलबंदी पाहण्यास मिळाली ते म्हणजे पाशात्या क्लेपबॉक्स वाद्य, भारतीय बासुरी व भारतीय पखवाज वाद्यांची जुगलबंदी. या अनोख्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले बांसुरी वादक श्री प्रकाश घाटकर यांचे शिष्य कु. वाल्मिकी वालावलकर ( आकेरी ) पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांचे शिष्य व क्लॅपबॉक्स वादक ( पखवाज विशारद ) कु. संकेत म्हापणकर ( सावंतवाडी ) व पखवाज वादक कु.हर्षल म्हापणकर (म्हापण) यांनी केले.

सिंधुदुर्गात श्री जगन्नाथ संगीत विद्यालयातील विद्यार्थी नेहमी वेगळा संगीत आविष्कार करत असतात तर ही ताल वाद्यांची जुगलबंदी सर्व श्रोत्यांना विलक्षण संगीत अनुभव देणारी ठरली.

प्रतिक्रिया व्यक्त करा