You are currently viewing संचयनी घोटाळ्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश

संचयनी घोटाळ्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश

मुंबई :-

संचयनी सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट इंडिया या कंपनीने मॅच्युरिटी होऊनही ठेवीदारांच्या ठेवी परत दिलेल्या नाहीत या सर्वांची चौकशी करून कंपनी व त्यांचे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

ही माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांना दिली आहे तसेच या सर्व प्रकरणासाठी एक स्वतंत्र अधिकारी नेमण्यात आल्याचेही अनुराग ठाकूर यांनी पत्रात म्हटले आहे

नारायण राणे यांनी अनुराग सिंह ठाकुर यांना पत्र लिहून संचयनीच्या बाबतच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे असे कळवले होते

या पत्रात त्यानीं पैसे देण्याची मुदत उलटूनही अद्यापही संचयन ने पैसे दिले नसल्याचे नमूद केले होते अनुराग सिंह ठाकुर यांनी लिहिलेल्या पत्रात या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच रिझर्व बँकेने या कंपनीला अवसायात घेऊन त्याचा लिलाव करून लोकांचे पैसे देण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी कोलकत्ता येथील उच्च न्यायालयात दावा दाखल केल्याचेही ना. ठाकूर यांनी कळवले आहे

ज्या गुंतवणूकदारांना पैसे मिळाले नाहीत त्यांच्याबद्दल त्यांना ते पैसे मिळावे यासाठी विशेष अधिकारी नेमण्यात आला आहे असे अनुराग सिंह ठाकुर यांनी कळवले आहे

संचयनीच्या घोटाळ्याची खुद्द माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी दखल घेतल्याने गुंतवणूकदारांची आशा पल्लवित झाली असून खासदार नारायण राणे यांनी दिलेल्या पत्रामुळे गुंतवणूकदारांच्या तक्रारीला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − eight =