You are currently viewing सुर्य कधी बोलत नाही

सुर्य कधी बोलत नाही

*अध्यक्ष बुलढाणा जिल्हा दक्षता समिती तथा सदस्य भाग्योदय लेखणी मंच….उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर लेखक कवी श्री मनोहर पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*सुर्य कधी बोलत नाही*

काळोखाच्या गहिऱ्या
वलयात सुर्य
येतो सहस्त्र किरणांनी
भूमंडळ प्रकाशीत करण्यासाठी…..!

सुर्य असतो वास्तव वादी
तो नाही करीत
भेदभाव…….!
झोपडीत ही देतो
अन् महालातही
लख्ख प्रकाश….!

सुर्य झाकोळला
तरीही झाकत नाही
सुर्यावर थुंकले तरीही….
त्याचे महत्व कमी
होत नाही …..!

तो असतो स्थित प्रज्ञ
प्रज्ञा सुर्याला….
झाकोळून गेले
ते होरपळून….. !!

सुर्य काहीच बोलत
नाही अन्…….
वाईट कुणाचे करीत
नाही …….!!

मनोहर पवार
चिखली ‘ जि बुलढाणा .

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =