समाधान चव्हाण यांचा सत्कार

समाधान चव्हाण यांचा सत्कार

जिल्हा उपवनसंरक्षण समाधान चव्हाण यांनी जिल्ह्यात साडेतीन वर्ष उत्कृष्ट काम केले असून वनखात्याच्या अंतर्गत विविध प्रलंबित प्रश्न व समस्या मार्गी लावून या पदाला न्याय दिला, असे गौरवोद्गार सावंतवाडी संस्थेचे खेमसावंत भोसले यांनी काढले‌.

चव्हाण यांची काँन्झव्हटर ऑफ फॉरेस्ट, कोल्हापूर येथे पदोन्नतीवर बदली झाल्याने त्यांच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी शेतकरी संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खेमसावंत भोसले बोलत होते. यावेळी विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश तळवणेकर, संस्थेनेचे लखम सावंत-भोसले, शेतकरी संघटनेचे नेते वसंत केसरकर, सहाय्यक वनसंरक्षक जळगावकर, दोडामार्ग वनक्षेत्रपाल दयानंद कोकरे, ओरसचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण देऊलकर, कृष्णा राऊळ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा