You are currently viewing निगेटिव्ह रूग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दिल्यामुळे माजगावात खळबळ..

निगेटिव्ह रूग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दिल्यामुळे माजगावात खळबळ..

भाजपा पदाधिका-यांनी विचारला जाब ; सर्व्हर मध्ये माहिती भरताना चूक झाल्याची सारवासारव

सावंतवाडी

निगेटिव्ह असलेल्या रुग्णांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट दिल्यामुळे माजगाव गावात खळबळ उडाली. संबंधिताचा रिपोर्ट चार दिवसानंतर पुन्हा आल्यानंतर याबाबत येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांना जाब विचारला.यावेळी सर्व्हर मध्ये माहिती भरताना हा प्रकार झाला.मात्र संबंधित रुग्ण निगेटिव्हच आहे घाबरण्याचे कारण नाही,असे सांगून शिरोडकर यांनी सारवासारव केली.त्यामुळे आरोग्य प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत माजगाव ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित रूग्णाने आठ दिवसापूर्वी आपली कोरोना चाचणी करून घेतली होती. त्यानंतर त्याला निगेटिव्ह,असा रिपोर्ट देण्यात आला होता.परंतु आठ दिवसानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचे दुसरा रिपोर्ट दिला.त्यामुळे त्या व्यक्तीच्या आजूबाजूला राहणारे आणि कुटुंब घाबरले.याबाबत नेमका प्रकार काय झाला.याची माहिती घेण्यासाठी आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी येथील आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांची भेट घेतली.यावेळी संबंधित रुग्ण हा निगेटिव्हच आहे. परंतु सर्व्हर मध्ये माहिती भरताना चुकीची भरले गेल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष बांदा मंडल महेश धुरी, ग्रा.सदस्य बाळा वेजरे, माजी सरपंच माजगांव मंगेश राठवड, अजय सावंत,अमित परब ग्रा.सदस्य चराठा आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − three =