You are currently viewing मनसेची उद्या कणकवलीत बैठक…

मनसेची उद्या कणकवलीत बैठक…

उपस्थित राहण्याचे माजी आमदार परशुराम उपरकर यांचे आवाहन…

कणकवली

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, २ एप्रिल रोजी मनसेचा होणारा पाडवा मेळावा या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा मनसेची महत्त्वाची व तातडीची बैठक उद्या १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता कणकवलीतील मनसे संपर्क कार्यालयाच्या बाजूला भवानी सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सिंधुदुर्ग मनसे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा सचिव, उपतालुकाध्यक्ष, यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे.

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व पाडवा मेळावा उत्साहात साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. तरी संबंधित पदाधिकाऱ्यांनी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन श्री उपरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 19 =