कणकवली पं. स.उपसभापती प्रकाश पारकर यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

कणकवली पं. स.उपसभापती प्रकाश पारकर यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

कासार्डे धुमाळवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह ५५ कुटुंबाना दिला मदतीचा हात

 अडीअडचणीला धावणारे हृदयस्पर्शी उपसभापती म्हणून निर्माण झाली ओळख

कणकवली

कणकवली पं. स. उपसभापती व उत्कृष्ट भजन सम्राट  प्रकाश पारकर बुवा यांच्या वतीने कासार्डे धुमाळवाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह ५५ कुटुंबाना सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून धान्य वाटप करण्यात आले.

गेली अनेक वर्ष समाजाशी नाळ जुळवून घराघरात आपल कुटुंब या नात्याने गेली ४० ते ४२ वर्ष छोट्या मोठ्या प्रत्येक प्रसंगाला आपला प्रसंग समजुन धाऊन जाणारे कणकवलीचे लोकप्रिय पं. स.उपसभापती  प्रकाश पारकर यांनी आजही आपली सामाजिक बांधीलकी जोपासली. त्यासाठी त्यांचे गावातून व आजूबाच्या परिसरातून आभार मानण्यात येत आहेत.

यावेळी राजु कदम, अभी धुमाळ, सहदेव म्हसके, सौरभ पारकर, विवेक पारकर, गणेश केसरकर, महेश पवार, उदय पारकर, आशीष केसरकर, प्रशांत पारकर, सुरेश पवार, प्रमोद पारकर,साइराज पारकर, अतुल पारकर, शुभम पारकर, व धुमाळ वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा