You are currently viewing बांदा उड्डाण पुलामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांचे पुनर्वसन करा

बांदा उड्डाण पुलामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांचे पुनर्वसन करा

ग्राम पंचायत सदस्य बाळू सावंत यांचे तहसीलदारांना निवेदन

बांदा

बांदा येथे होणाऱ्या उड्डाणपूलामुळे रस्त्यालगत असलेली दुकाने व स्टॉल हटविण्यात येणार असल्याने शेकडो कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यासाठी दुकानदारांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने विचार करत त्यांचे योग्य पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन सावंतवाडी तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

तहसीलदार महेश उंडे हे उपस्थित नसल्याने नायब तहसीलदार लता वाडकर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, रत्नाकर आगलावे, शामसुंदर धुरी, सिद्धेश नाईक आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, बांदा येथे प्रस्तावित असलेल्या उड्डाणंपुलाचे काम लवकरच सुरु होणार आहे. यासाठी लगतच्या स्टॉलधारकांना दुकाने काढण्यासाठी नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. गेली अनेक वर्षे शेकडो युवकांनी याठिकाणी स्टॉलची उभारणी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र आता स्टॉल काढण्यात येणार असल्याने या युवकांवर व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या स्टॉलधारकांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. व त्यांचे योग्य जागी पूनर्वसन करावे.
नायब तहसीलदार श्रीमती वाडकर यांनी आपले म्हणणे वरिष्ठाना सादर करण्याचे आश्वासन ग्रामस्थ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =