You are currently viewing श्री. क्षेत्र अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी असंख्य भाविकांची गर्दी

श्री. क्षेत्र अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी असंख्य भाविकांची गर्दी

कणकवली

दिनांक ०३ जानेवारी २०२३ रोजी श्री. क्षेत्र अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ यांच्या पादुकांची परिक्रमा कणकवली येथील शांती निवास कलमठ गोसावीवाडी येथे वास्तव्यास होती.

यावेळी असंख्य भाविकांनी श्री. स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले. सर्व भाविकांसाठी तीर्थप्रसाद तसेच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

हजारो भाविकांनी यावेळी श्री. स्वामी समर्थ दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. सर्व भक्तगण श्री. स्वामी समर्थ पादुकांच्या दर्शनाने उल्हासित झाले.

अशा प्रकारे हा सोहळा आनंदाने द्विगुणित करण्यात आला. तसेच श्री. स्वामी समर्थ पादुकांची परिक्रमा दिनांक ०४/०१/२०२३ रोजी मालवण येथे जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा