दोडामार्ग तालुक्याला दोन सभापती पदे…

दोडामार्ग तालुक्याला दोन सभापती पदे…

डॉ अनिशा दळवी आरोग्य व शिक्षण सभापती तर अंकुश जाधव समाजकल्याण सभापती

दोडामार्ग

भारतीय जनता पार्टीच्या कोनाळ मतदार संघातून प्रतिनिधीत्व करणाऱ्या जिल्हा परीषद सदस्य अनिशा दळवी यांची सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेच्या शिक्षण व आरोग्य समिती सभापती तर मूळचे दोडामार्ग तालुक्यातील पण ओरोस येथून जि प चे प्रतिनिधीत्व करणारे अंकुश जाधव यांची समाजकल्याण समिती सभापती पदी निवड करण्यात आली आहे.

त्याबद्दल दोन्ही जिल्हा परीषद सदस्यांचे दोडामार्ग तालुक्यातून मनपुर्वक अभिनंदन होत असून भारतीय जनता पार्टीचे नेते मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेश सरचिटणीस रविंद्रजी चव्हाण व आमदार नितेश राणे साहेब यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत ही जबाबदारी दिल्याने भाजपा दोडामार्ग कडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा