You are currently viewing आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या बारावी परीक्षेचा शंभर टक्के निकाल…

आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या बारावी परीक्षेचा शंभर टक्के निकाल…

उत्कर्ष मगदुम प्रथम; तर आदित्य रेड्डी द्वितीय व आर्यन शिरसाट तृतीय…

आंबोली

येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलमधील बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यात उत्कर्ष महेश मगदुम याने ९२.३३ % गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकाविला. तर आदित्य संजिव रेड्डी याने ९१.३३ % गुणांसह द्वितीय व आर्यन अरूण शिरसाट याने ९१.०० % गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला आहे. यावर्षी बारावी परीक्षेसाठी एकूण ३८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील सर्वच्या सर्व विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले.

आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी NDA लेखी परीक्षेत तसेच JEE , CET , NEET परीक्षेत यश प्राप्त केले आहे. शाळेचे अनेक विद्यार्थी आर्मी, नेव्ही, मर्चंट नेव्ही, बहुराष्ट्रीय कंपनी आदि क्षेत्रात अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. शाळेत निवासी सैन्य प्रशिक्षण, कवायत युद्ध कौशल्य, आत्मसंरक्षण ,विविध साहसी खेळ व स्पर्धात्मक परीक्षा ‘ NDA , CET , JEE , NEET ‘ यांचे मार्गदर्शन केले जाते . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री पी . एफ. डोन्टस, सचिव सुनिल राऊळ, संचालक शंकर गावडे, शिवाजी परब, जॉय डान्टस, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ व सर्व संचालक मंडळ कमांडट सुनिल सिन्हा व प्राचार्य सुरेश गावडे पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा