You are currently viewing सिंधु धनवृध्दी विषेश ठेव योजनेचा मनिष दळवी यांच्या हस्ते शुभारंभ.

सिंधु धनवृध्दी विषेश ठेव योजनेचा मनिष दळवी यांच्या हस्ते शुभारंभ.

१ दिवसात कसाल शाखेने गोळा केली १ कोटी ठेव.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ठेवीदारांसाठी नववर्षाची भेट म्हणून ०२ जानेवारी २०२३ पासून ज्यादा व्याजदराची धनवृध्दी विषेश ठेव योजना सुरू केली. या योजनेचा शुभारंभ सोमवार दि.०२ जाने.२०२३ रोजी बँकेचे अध्यक्ष श्री. मनिष दळवी यांच्या हस्ते बँकेचे प्रधान कार्यालय ओरोस येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, समीर सावंत, श्रीम.नीता राणे, विठ्ठल देसाई, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारीअधिकारी प्रमोद गावडे, बँक अधिकारी, कसाल शाखेचे व्यवस्थापक विजय शृंगारे, श्रीम. रजनी कदम, ठेवीदार यावेळी उपस्थित होते.
शुभारंभ प्रसंगी कसाल शाखेने एका दिवसात सुमारे रू.१ कोटी ठेव गोळा केली असुन ठेव प्रमाणपत्र बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व बँक संचालक महोदय यांचे हस्ते ठेवीदारांना यावेळी देण्यात आले. जिल्ह्यातील ग्राहक व ठेवीदारांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. असाच विश्वास ग्राहक व ठेवीदारांनी कायम बँकेवर ठेवावा. सर्व आर्थिक व्यवहार आमच्या बँके मार्फत करावेत. तसेच सिंधु धनवृध्दी ठेव योजनेत जिल्हा वासियानी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी यावेळी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा