You are currently viewing मालवण नगरपरिषदेकडून उघड्यावर कचरा व शौच करणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई

मालवण नगरपरिषदेकडून उघड्यावर कचरा व शौच करणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई

पर्यटकांनी मौजमजा करताना निसर्ग संवर्धन व शहर स्वच्छतेचा विचार करावा :- मुख्याधिकारी श्री.संतोष जिरगे

मालवण

महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळेच देश विदेशातून पर्यटकांची पावले सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वळू लागली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे पर्यटन शहर असून नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. अलीकडेच मालवण नगर परिषदेने दिल्ली येथे इंडियन स्वच्छता लीग मध्ये देश पातळीवर पुरस्कार मिळवला आहे. त्यामुळे मालवण शहराचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. मुख्याधिकारी श्री.संतोष जिरगे यांच्यासारख्या उत्तम प्रशासकाच्या मार्गदर्शनाखाली मालवण नगरपरिषद सर्वोत्तम कार्य करत आहे. त्यामुळे मालवणात पर्यटकांचा ओढा वाढलेला पहावयास मिळतो.
आज रोजी न. च. रांका हायस्कूल बोधवड, जळगाव येथील काही पर्यटकांकडून मालवण नगरपरिषद हद्दीत उघड्यावर कचरा व शौच केले गेले. त्यामुळे उघड्यावर कचरा व शौच केले कारणाणे मालवण नगरपरिषदेने या पर्यटकांवर पाच हजार (५०००/-) रुपये दंडात्मक कारवाई केली. सदर ठिकाणी आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, आरोग्य लिपिक मंदार केळुसकर व मिथुन शिगले उपस्थित होते.
मालवण नगरपरिषद स्वच्छतेसाठी दिवस रात्र मेहनत घेत असताना अशा प्रकारचे अस्वच्छतेचे प्रकार पर्यटकांकडून केले जात असल्याने मालवण नगरपरिषदेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला. पर्यटकांनी मौज मजा करताना निसर्ग संवर्धन व शहर स्वच्छतेचाही विचार करावा, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा