You are currently viewing टीम शिवाजी ‘ क्लासिक बॉडी बिल्डिंगचे मानकरी ठरले माजी सैनिक राजेश हिरोजी

टीम शिवाजी ‘ क्लासिक बॉडी बिल्डिंगचे मानकरी ठरले माजी सैनिक राजेश हिरोजी

सावंतवाडी

महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन व सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन पुरस्कृत ‘टीम शिवाजी ‘ क्लासिक २०२२ जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग आणि मेन्स शरीरसौष्ठव स्पर्धा सावंतवाडीत पार पडली. या स्पर्धेत माजी सैनिक राजेश हिरोजी, प्रो- फिटनेस, वेंगुर्ला हे विजेता ठरले. शरीरसौष्ठव विजेता टीम शिवाजीचा ओम सावंत, बेस्ट पोझर सातेरी जिम वेंगुर्लेचा चंद्रकांत कुबल तर टीम शिवाजीचे रामदास राऊळ हे मोस्ट इम्प्रूव्ड ठरले.

या स्पर्धेला स्पर्धकांसह रसिकांचा मोठा प्रतिसाद या स्पर्धला मिळाला. यावेळी तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पाच ते सहा राउंडमध्ये ही स्पर्धा झाली. प्रत्येक राउंडमधील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देत गौरव करण्यात आला.

या स्पर्धेतील विजेते राजेश हिरोजी हे माजी सैनिक असून सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी बॉडी बिल्डिंगवर मेहनत घेतली. अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी या स्पर्धेच विजेते पद पटकावलं. अन्य विजेत्या स्पर्धकांनीही उपस्थित रसिकांची मने जिंकली.

यावेळी बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, बॉडी बिल्डर अतुल आम्रे, करण चौधरी, आशिष वर्तक, डॉ. राजन जाधव, टीम शिवाजीचे शिवाजी जाधव, सतिश बागवे, यश सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा