ऑनलाईन औषध विक्रीत टाटा डिजिटल उतरण्याचे संकेत

ऑनलाईन औषध विक्रीत टाटा डिजिटल उतरण्याचे संकेत

दिल्ली :

आता ऑनलाइन फार्मसी मध्ये टाटा समूहातील सबसिडीयरी टाटा डिजिटल सेगमेंटमध्ये उतरण्याची  तयारी करत आहे. टाटा डिजिटल ने सांगितल्याप्रमाणे ऑनलाइन फार्मसी कंपनी 1 एमजी टेक्नॉलॉजी लिमिटेड मधील मोठी हिस्सेदारी खरेदी करणार आहे. बिग बास्केट नंतर टाटा डिजिटल आता डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी दुसऱ्या महत्त्वपूर्ण स्टार्टअपचे अधिग्रहण करणार आहे.

टाटा समूह ई-कॉमर्स सेगमेंटमध्ये दमदारपणे उतरत असून यामध्ये सुपर ॲप आणण्याची योजना तयार केली आहे. सदरच्या अधिग्रहणामुळे आणि गुंतवणुकीमुळे टाटा समूह सुपरॲपला मजबूत स्थिती प्राप्त होणार असल्याचे सांगितले जात आहे.

1 एमजी चे अधिग्रहण टाटा समूह करिता महत्त्वाचे मानले जात आहे. कारण रिलायन्स इंडस्ट्रीज ऑनलाइन फार्मसी सेगमेंटमध्ये पाय ठेवत नेटमेड्सचे अधिग्रहण केले आहे. ई- कॉमर्स क्षेत्रात टाटा समूहाची टक्कर प्रामुख्याने फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि रिलायन्स रिटेल या दिग्गज कंपन्याबरोबर असेल.

टाटा डिजिटल चालू आठवड्याच्या सुरुवातीला फिटनेस स्टार्टअप क्लोरोफिट हेल्थकेअर मध्ये  550 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती. या व्यवहारांत क्योरफीटचे सहसंस्थापक मुकेश बन्सल टाटा डिजिटलचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा