You are currently viewing मालवण तालुका काँग्रेस कमीटीच्या वतीने वायरी येथे स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

मालवण तालुका काँग्रेस कमीटीच्या वतीने वायरी येथे स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

मालवण

मालवण तालुका काँग्रेस कमीटी च्या वतीने आज वायरी येथील आर.जी.चव्हाण कार्यालयात गरीबी हटाओ चा नारा देत सर्व घटकांच्या प्रगतीसाठी नवनवीन योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या, आपल्या कणखर नेतृत्वाने जागतिक राजकारणात भारताला सक्षम बनवणाऱ्या भारताच्या आर्यन लेडी’ स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त व लोहपुरुष स्व. *वल्लभभाई पटेल* यांच जयंतीनिमित्त पुण्यस्मरण करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आल..

या वेळी स्व. इंदिराजीं च्या राजकीय नेतृत्वाची क्षमता त्यांनी घेतलेले निर्णय व महिला असूनही देशासाठी केलेलं काम हे आजही प्रेरणादायी असल्याचं मत ममता तळगावकर यांनी व्यक्त केलं

इंदिराजींनी गोरगरिबांना, सामान्याना दिलेला न्याय व सध्याच्या केंद्रातील सरकारने गरीब, सामान्य, जनतेची केलेली फसवणूक यावर तालुकाध्यक्ष धुरी यांनी आपलं मत व्यक्त केलं

यावेळी तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, विधानसभा नेते अरविंद मोंडकर, जेष्ठ पदाधिकारी आप्पा चव्हाण, संदेश कोयंडे, सरचिटणीस महेंद्र मांजरेकर, मधुकर लुडबे, संजय धुरी, योगेश्वर कुर्ले, युवक तालुकाध्यक्ष अमृत राऊळ, युवक शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर, उपाध्यक्षा ममता तळगावकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =