You are currently viewing कणकवली नगरपंचायतला १३ कोटीचा विकास निधी

कणकवली नगरपंचायतला १३ कोटीचा विकास निधी

३८ विकास कामे मार्गी लागणार: समीर नलावडे, बंडू हर्णे यांनी दिली माहिती

कणकवली

कणकवली नगरपंचायतीला विकासासाठी आ.नितेश राणे यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री रवींद्र चव्हाण
यांनी १० कोटींचा निधी दिला आहे.या निधितून कणकवलीतील ३८ विकास कामे मार्गी लागणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.कणकवली नगरपंचायतच्या इतिहासात प्रथमच एकत्रित एवढा मोठा निधी मिळाला आहे.असे ते म्हणाले.

कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे बोलत होते. कणकवली नगरपंचायतला युती शासनाच्या माध्यमातून १३ कोटीचा निधी मिळाला आहे.नगरपंचायतच्या इतिहासात सर्वात प्रथम एकत्रित एवढा मोठा निधी मिळाला आहे.यासाठी आमदार नितेश राणे यांनी पाठपुरावा केला.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे विशेष आभार मानत आहोत,असे नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे म्हणाले.

कणकवली नगरपंचायत विकाक्सासाठी आ.नितेश राणे यांच्या अथक परिश्रम केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० कोटींचा निधी दिला आहे.याबाबत विविध ३८ विकास कामे करण्यात येणार आहे.तीन महिन्यापूर्वी आम्ही दिवाळी बंपर निधी मिळणार असल्याचे जाहीर केले होते त्याची आता पूर्तता झाली आहे. त्यात १० कोटींचा आणि २.६० कोटी धबधबा निधी आला आहे.या मध्ये नागरी सुविधा व सेवा पुरवण्यासाठी काम केले जाणार आहे.मागच्या सरकारने ही कामे अडवली होती,काही नेत्यांच्या विरोधामुळे त्याला निधी मिळत नव्हता.आत्ता आम्हाला न्याय मिळाला आहे.ही कामे मार्गी लावली जातील,३८ कामे मंजूर झाली आहेत. कणकवली शहराचा सर्वांगीण विकास आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून केला जाईल.कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाही,याची काळजी सत्ताधारी म्हणून आम्ही घेऊ असा विश्वासही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा