You are currently viewing सिंधुदुर्ग पासूनच जन आशीर्वाद यात्रा सुरू करणार; त्यात व्यत्यय येणार नाही – केंद्रीय मंत्री नारायण राणे

सिंधुदुर्ग पासूनच जन आशीर्वाद यात्रा सुरू करणार; त्यात व्यत्यय येणार नाही – केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुंबई

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. परवापासून मी यात्रा सुरू करणार आहे. सिंधुदुर्गापासून यात्रा सुरूच ठेवणार आहे. त्यात व्यत्यय पडणार नाही, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे सिंधुदुर्गात जमावबंदी असतानाही राणेंनी जन आशीर्वाद यात्रा सुरूच ठेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

कालच्या अटक आणि सुटकेच्या नाट्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. रत्नागिरीवरून सकाळी साडेपाच वाजता मी मुंबईत पोहोचलो. दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागले आहेत. याचा अर्थ देशात किंवा देश कायद्याने चालतो हे सिद्ध झालं आहे. 17 सप्टेंबरपर्यंत कोर्टाची केस असल्याने मी काही गोष्टीवर भाष्य करणार नाही. पण एवढा दौरा केल्यानंतर पत्रकारांना न भेटणं योग्य वाटलं नाही. म्हणून पत्रकारांना दौऱ्याची माहिती देण्यासाठी पीसी घेतली आहे, असं राणेंनी सुरुवातीला स्पष्ट केलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा