You are currently viewing माणगाव खोऱ्यातील शंकराच्या पूर गावातील जत्रोत्सवात जुगाराचा मोठा फड

माणगाव खोऱ्यातील शंकराच्या पूर गावातील जत्रोत्सवात जुगाराचा मोठा फड

*संवाद मीडियाच्या बातमीनंतर खाकी वर्दी झटकली जबाबदारी..*

 

कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरे हे अतिशय दुर्गम भागात येते. कुडाळ शहरातून माणगाव खोऱ्यातील शेवटच्या टोकापर्यंत पोहचायला साधारणपणे दोन तास पेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे माणगाव खोऱ्यात सुरू असलेल्या जत्रोत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगाराच्या मैफिली सजवल्या जात आहेत. माणगाव खोऱ्यातील जत्रोत्सवांमध्ये जुगाराची भोई वाहणाऱ्या खाकी वर्दीने आज होणाऱ्या “शंकराच्या पूर” गावातील जत्रोत्सवाची जबाबदारी झटकली असून संवाद मीडियाच्या बातमीचा इम्पॅक्ट जुगाराची भोई वाहणाऱ्या खाकी वर्दीवर झाल्याचे दिसून येत आहे. “शंकराचे पूर” हे गाव माणगाव खोऱ्यातील शेवटचे टोक म्हटले जाते. या गावात आज जत्रोत्सव होत असून कोल्हापूर, गोवा येथील जुगारी जुगार खेळण्यासाठी दाखल झाले आहेत. चाफेली येथून नियोजित जुगाराच्या मैफिलींच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी यंत्रणा सज्ज केलेली असून मोठ्या प्रमाणावर बाहेरील जुगारी या जत्रोत्सवात दाखल झालेले आहेत. *इना* आणि *मीना* अशा नावाचे दोन मुख्य तक्षिमदार असून लाखो रुपयाची उलाढाल या जुगारांमधून होत असल्याची खात्रीलायक माहिती संवाद मीडियाला प्राप्त झालेली आहे.

जुगाराची भोई वाहणारे खाकी वर्दीतील माणगाव खोऱ्याचे शिलेदार यांनी जुगाराची जबाबदारी घेण्याचे टाळले व स्वतःच्या जबाबदारीवर जोखीम घेऊन ईना आणि मीना या तक्षिमदारानी जुगाराच्या बैठका बसविलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जत्रोत्सवात सुरू असणारे हे जुगार पोलीस यंत्रणेला आव्हान ठरत असल्याने पोलीस यंत्रणात कुचकामी आहे की काय? असा प्रश्न माणगाव खोऱ्यातील जनतेला पडलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी माणगाव खोऱ्यात सुरू असलेल्या जुगाराची योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी माणगाव खोऱ्यातून होऊ लागली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा