You are currently viewing निरवडेत दुचाकीला ठोकर देऊन एसटी चालकाचे पलायन…

निरवडेत दुचाकीला ठोकर देऊन एसटी चालकाचे पलायन…

निरवडेत दुचाकीला ठोकर देऊन एसटी चालकाचे पलायन…

दोघे जखमी; अधिकाऱ्यांच्या उडवा-उडवीच्या उत्तराने ग्रामस्थ आक्रमक…

सावंतवाडी

भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने दुचाकीला मागून ठोकर दिली. यात दोघे जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी ११.३० ला निरवडे येथे घडली. अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे. दरम्यान जोपर्यंत घटनास्थळी बस चालक येत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते चेतन गावडे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सौ .गावडे या निरवडे च्या दिशेने दुचाकी घेऊन येत होत्या. यावेळी सावंतवाडी भटपावणी जाणाऱ्या बसने त्या दुचाकीला मागून ठोकर दिली. यावेळी रस्त्याच्या कडेला दुचाकी पडली व सौ. गावडे व त्यांच्या मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी त्या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी निरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दोघा जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर अपघात झाल्यानंतर बस चालक का थांबला नाही असे विचारण्यासाठी एसटी कार्यालयात संपर्क साधला असता श्री. राठोड यांनी उडवा उडवी ची उत्तरे देत तुम्ही काय ते करून घ्या असे सांगितले. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जोपर्यंत बस चालक आणि राठोड हे घटनास्थळी येत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून बस सोडणार नाही, असा इशारा दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा