You are currently viewing एक थेंब

एक थेंब

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी सुभाष उमरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*एक थेंब*

अश्रूचा एक थेंब
गालावर ओघळला …!
ओंजळीतल्या काळजातून
हळूवार पाझरला …!!

ओस झालेल्या मनाला
थोडा ओलावा मिळाला …!
पालवी फुटली नव्याने
क्लेश मनाचा सरला ….!!

हवा हवासा गारवा
तन मोहरून आले
मळभ दाटले नभी
धुंद होऊन बरसले ….!!

मन वादळी वादळी
बेधुंद हा झाला वारा
नित्याचेच हे क्षण
हवा कशाला निवारा …!!

बेरीज आयुष्याची केली
हातात ठेवले काही
कशाला ती वजाबाकी
उरले हाती न काही….!!

*सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक*

प्रतिक्रिया व्यक्त करा