You are currently viewing अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पादुका येणार दोडामार्गात 

अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पादुका येणार दोडामार्गात 

दोडामार्ग

अक्कलकोटहून श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती व पादुकाचे आगमन २९ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दोडामार्ग शहरात होणार आहे. समर्थांच्या पादुकांची मिरवणूक राष्ट्रोळी मंदिर सावंतवाडा ते पिंपळेश्वर हॉल बाजारपेठ अशी काढण्यात येणार आहे. कासारपाल खैटवाडा-गोवा येथील श्री सातेरी भूमिका दिंडी पथकही येणार आहे. सायंकाळी ७:१५ वा. आरती, तद्नंतर महाप्रसाद, रात्री ८:३० वा. दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळाचे स्वामी अन्नपूर्णा हा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. स्वामींच्या पादुकांच्या दर्शनासाठी भक्तगणांनी उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा