You are currently viewing बांदा भाजपाच्या वतीने रंगभरण व खुल्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

बांदा भाजपाच्या वतीने रंगभरण व खुल्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

बांदा

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८ व्या जयंती निमित्त बांदा भाजपाच्या वतीने २५ डिसेंबरला रंगभरण आणि खुल्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येथील अटलबिहारी वाजपेयी उद्यानात सायंकाळी ४:०० वा. घेण्यात येणार आहे. यावेळी या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती पुढील प्रमाणे आहे. रंगभरण स्पर्धा पहिला गट -बालवाडी ते दुसरी इयत्ता, दुसरा गट – इयत्ता तिसरी ते पाचवी, तिसरा गट – इयत्ता सहावी ते आठवी असा असणार आहे. तर चित्रकला स्पर्धा इयत्ता नववी ते खुला गट (वयोमर्यादा नाही), चित्रकला स्पर्धेसाठी अटल बिहारी वाजपेयी यांचे पोट्रेट, भारतीय सण आदी विषय असणार आहेत. सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. तरी अधिक माहितीसाठी केदार ९४२२३९४०७५ / ९८२३६६११३३ या नंबर वर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा