You are currently viewing कवयित्री संध्याराणी कोल्हे यांचा साहित्यक्षेत्रातील छावा.

कवयित्री संध्याराणी कोल्हे यांचा साहित्यक्षेत्रातील छावा.

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*सामाजिक तथा साहित्यिक क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कार्याने वेगळा ठसा उमटविणारे लेखक चौफेर कवी सूरज अंगुले लिखित अप्रतिम लेख*

*कवयित्री संध्याराणी कोल्हे यांचा साहित्यक्षेत्रातील छावा.……*

महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यत कळंब तालुक्यातील माझे प्रेरणास्त्रोत कवयित्री. संध्याराणी कोल्हे यांचा सर्वांना थक्क करून टाकणारा प्रवास साहित्य क्षेत्रातील दिव्य योगदान आहे.सर्वांना चकित करून टाकणार आहे. साहित्य क्षेत्रातून झालेली मैत्री ते बहीण भावाच्या नात्यांमध्ये रूपांतर होऊन षटकोळी ते क्रांती साहित्य विचार मंचच्या समूहापर्यंत वाचक रसिकांना सोबत घेऊन मी पणा नसलेली महाराष्ट्राची बहिणाबाई होय. माझ्या थोरल्या बहिणी बद्दल मी काय सांगू? काय बोलू? काय तिची काया? अन काय तिची माया अशीच आहे. कोणतंही कार्य करताना इतकंच झपाट्यानं आणि प्रगल्भ अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचं दर्शन त्यांच्या लेखणीतून होत आहे. साहित्य क्षेत्रामध्ये सर्वजण आपापलं मत व्यक्त करत असतात किंवा काव्याच्या रूपामध्ये व्यक्त होऊन कवी कवयित्री होण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर त्यांनी स्वतंत्र षटकोळी हा नवीन काव्यप्रकार शोधून त्याची नियमावली तयार करून नियमात लिहिणं आणि लिहायला दुसऱ्यांना प्रोत्साहित करणं ही बाब महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांसाठी आणि तुमच्या आमच्यासाठी सुद्धा एक आदर्श शिक्षिका कवयित्री आहे. ते काम इतका विशाल आहे की, त्याचा मोजमाप आपण कशातही करू शकत नाही. या छाव्याचा अजून एक गुणधर्म सांगायचा झाला की बाईने बाई कडून शिकावं की बाई कशी असावी त्याचं कारण म्हणजे दुसऱ्याचे उने धुणे न काढता आपण आपल्या परीने आदर्श व्यक्तिमत्व कसं सिद्ध करायचे ते फक्त हातामध्ये लेखणी आहे ते लेखणीच्या टोकावर ते त्यांनी हे त्यांच्या छाव्यातून आज आजमावून पाहत आहेत. महाराष्ट्र शासनाला मी एवढीच विनंती या लेखाद्वारे व्यक्त करतो की ते जिवंत असेपर्यंत एकदा तरी पाठ्यपुस्तकातील कवयित्री होताना मला बघायला नक्की आवडेल. मरणोत्तर कोणीही होऊ शकतो पण जिवंत असताना मिळालेला आस्वाद वेगळाच असतो अशा या रणरागिणीला मनापासून सलाम
करतो.
आपलं रोखठोक मत आणि मत मांडल्यानंतर इतर कोणाचंही मत त्यावरती असू नये आणि असणार नाही.अशा पद्धतीने साहित्याचा गड दांडपट्ट्यासारखं चालवत आहेत. दांडपट्ट्याची चकाकी म्हणजे त्यांच्या लेखणीची चकाकी म्हणायला काही हरकत नाही अभ्यासू व्यक्तिमत्वाला परावरच नाही इ.स.वी सन २०१४ मध्ये ते साहित्य क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल सकारात्मक टाकले त्या २०१४ मध्ये कथा,कविता,लेख,कादंबऱ्या इतरांच्या वाचून प्रेरणा घेऊन त्या आपल्या शब्दात कशा करता येतील त्या पद्धतीने शाब्दिक हल्लाबोल किंवा काव्य बरसात करता येईल हे त्यांचं मूळ तंत्र आहे. या तंत्रात मुखातील वाणी आणि विचाराची आणीबाणी वाचनाचे एक प्रेरणास्त्रोत होऊन इतरांना ते झऱ्यासारखं पाझरून देऊन गडकिल्ल्यातील पाणी म्हणायला काही हरकत नाही. वैचारिक युद्धातील परखड मत मांडून आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून इतिहासाच्या नावावर सुवर्ण अक्षराने नाव कोरून ठेवावं असंच आहे. एवढं स्तुती तुम्ही का उधळता असं तुम्हाला कदाचित वाटेल,परंतु ते आपल्याजवळ असून सुद्धा ते आपल्याला समजत नाही परंतु सर्व काही आपल्यापाशी आहे. पण ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे कारण मला तर असं वाटतं खूप स्त्रिया असतात परंतु याच्यासारखी स्त्री आतापर्यंत मला पाहायला मिळाली नाही,कारण हेवेदावे कोणाचेही न करता आपला आपण आपला निर्णय आपणच घ्यावा हे त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. पुढे पुढे जसं जातील तसा तस एक-एक पावलाचा त्यांचा आमच्या मस्तकावरती पडावा आणि तुमच्यासारखी बुद्धी तेज विचारसरणी आम्हाला ईश्वराने द्यावं ही श्रींची इच्छा आहे,असं कदाचित मी मानू शकतो.कालांतराने इ.स.वी सन २००५ मध्ये त्यांचा विवाह कळंब चे श्री.रमेश कदम यांच्याशी झाला. बघता बघता तीन वर्षांमध्ये २००८ मध्ये एका सुंदर गोंडस मुलाला जन्म दिला. आणि त्या बाळाचे नाव आहे.ओम कोल्हे तोही तितकाच चाणक्य आणि हुशार विद्वान आहे. कारण घरातून मिळालेलं बाळकडू आज शालेय जीवनात वावरत असताना ते मला जवळून पाहायला मिळतं.त्याच्या कलागुणांना वाव कसा मिळवून देता येईल त्याचबरोबर इतरांच्या ही मुलांना कसं लक्ष देता येईल तेही तितक्याच पद्धतीने पारंगत होतील यावरती लक्ष केंद्रित करत असतात. कोल्हे बाई कारण त्या एकटाच मुलाची आई न होता शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आदर्श शिक्षिका माता आहे म्हणून आम्हाला तुमचा गर्व वाटतो. हा सर्व साहित्याचा संसार थाटताना अनेक संस्थेने त्यांना पुरस्कार विविध जिल्ह्यांमधून प्रदान केले. आत्तापर्यंत त्यांचं केवळ ते कष्टाची पोचपावती आहे. परंतु एक गोष्ट जाणवली की ते पुरस्काराच्या मागे नसून ते पुरस्कार त्यांच्या मागे आहेत,कारण कार्य तितकं विशाल आहे निसर्ग जस दरा खोऱ्यात मौनास आहे,तसा मौनातली शान म्हणजे त्यांची लेखणी होय. त्यांच्या लेखनींना काही काही जणांना गार केला आहे. काही ठिकाणी आम्ही सोबत कार्य केलं. त्या ठिकाणी लोखंडाचे सोनं होईल अशाच पद्धतीने केलं.इतरांनाही प्रोत्साहित करणं हे साहित्यिकाच पहिलं काम आहे. आणि ते आम्ही सढळ हाताने करत आहोत यापुढेही श्वास श्वासात असेपर्यंत करत राहू असा आमचा ठाम विश्वास आहे.
काही जणांना गैरसमज झाला तो गैरसमज त्यांच्या त्या बुद्धिमत्तेचा एक प्रदर्शनाचा भाग आहे. त्यांना आपण दोष देऊ शकत नाही. क्रांती साहित्य विचार मंचाची स्थापना इ.स.वी सन २०१९ मध्ये झाली मी स्वतः त्यांना समूह प्रशासक म्हणून नेमणूक केली. त्यांच्या सोबतीला सौ. निशा खापरे नागपूर यांची सांगड घालून दिली माणसाच्या विचारातून क्रांती होते म्हणजे हा आमचा क्रांती साहित्य विचार मंच आहे. विविध स्पर्धा घेऊन साहित्यिकांना लिहीत केलं.तेवढच करून न थांबता अमुलाग्र कसा बदल करता येईल यावरती आमचं लक्ष केंद्रित आहे. मला असं वाटतं की, प्रत्येक जिल्ह्यातील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्रात असाही एकही जिल्हा राहणार नाही की, त्यांना त्या जिल्ह्यातला पुरस्कार मिळालेला नाही असं कदाचित होणार नाही. त्याचबरोबर आध्यात्मिक वारसा जपून आपल्या संसाराचा गाडा सुखाने हाकत आहेत. विविध विषयात पारंगत असून अशी कवयित्री लेखिका आदर्श शिक्षिका पुन्हा होणे नाही. महाराष्ट्रातील खऱ्याखुऱ्या ह्याच बहिणाबाई म्हणाला काहीही हरकत नाही. त्यांचे जे लिखाण आहे ते आत्तापर्यंत आजरामर ठरत आहे. या लिखाणावरती कोणीही मत मतांतर करूच नये आणि करणार नाही असं मला वाटतं. संध्याराणी कोल्हे आणि निशा खापरे हे एक जणू एका गाडीचे दोन चाके आहेत. मिळून एक क्रांती साहित्य विचार मंच नावाचा बुलेट ट्रेन आज महाराष्ट्रात वेगाने धावत आहे. त्यांचे मी जेवढे गुणगान गाईल तेवढे कमी आहे.त्यांची बुद्धिमत्ता विचारसरणी आधुनिक काळाला मार्गदर्शक विचारदायक, प्रेरणादायी आणि प्रेरणास्त्रोत असेच आहे. संसार शाळा आणि साहित्य या त्रिवेणी संगमातून आपला ठसा इतिहासावर नोंद करून घ्यावा अशाच पद्धतीने आहे. षटकोळी नावाचा नवीन काव्यप्रकार शोधून दररोज लिखाण करून त्या लिखाणावरती आपला ठसा उमटवला आहे. इतरांनाही प्रोत्साहित करून लिहत केलं आहे. माझी थोरली बहीण असल्यामुळे मला या काळात या विश्वात या क्षेत्रात कोणतीही उणीव भासणार नाही असा एक ठाम विश्वास ठासून भरला आहे. जसे म्हणतात ना “चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका” तशाच पद्धतीने आपला दरारा मला पहावयास अनुभवास मिळत आहे. हे मी माझं भाग्य स्वतःच समजतो साहित्य क्षेत्रामध्ये आतापर्यंत जे विषय झालेले नाही त्या विषयाला हात घालून विविध विषयावरती चर्चासत्र,चारोळ्या, षटकोळी क्रांती साहित्य विचार मंचामध्ये आपला हिरीरीने सहभाग त्यानंतर एक समूह प्रशासिका म्हणून योग्य पद्धतीने आपला कार्यभार सांभाळत आहे.हेवे दावे करणारे खूप आहेत. पण त्यातले त्या नाहीत म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो. हे ठासून आलेला लिखाण आज वाचक रसिकांना प्रेरणास्त्रोत असेल आणि असणार यात काही शंका नाही. एक अभूतपूर्व सोहळा त्यांच्या सेवेने आपल्यासमोर सादर होत आहे. या सादरीकरणात आलेल्या अडचणींना तोंड देऊन पावनखिंडीतल्या लढाई सारखं बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका त्या पार पाडत आहेत म्हणून मनस्वी आनंद होत आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी लिहिलेलं त्यांचं लिखाण मला खूप आवडतं शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र,संताची कामगिरी,मराठा सरदार-भोसल्यांचे कर्तबगार घराणे, शिवरायांचे बालपण, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण बांधले,स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त,प्रतापगडावरील पराक्रम शर्तीने खिंड लढवली, शाहिस्तेखानाची फजिती, पुरंदरचा वेढा व तह, बादशहाच्या हातावर तुरी दिल्या, गड आला पण सिंह गेला, राज्यकारभाराची घडी बसवली, दक्षिणेतील मोहीम,शिवरायांची युद्धनीती,रयतेचा राजा,स्फूर्तीचा जिवंत झरा,या संगमातून त्याचं लिखाण या महाराष्ट्राला कायम तेवत ठेवेल हे काळालाही न पुसता येणारी रेघ आहे. आपल्या साहित्य क्षेत्रावर अपार प्रेम केलेली एक दर्जेदार उत्तम साहित्यिका आदर्श शिक्षिका आदर्श माता अशी भूमिका बजावत असल्यामुळे विशेष म्हणजे माझ्या जिल्ह्यातील असल्यामुळे मला खूप खूप अभिमान वाटतो.त्यांचं तेजस्वी आणि ओजस्वी असं लिखाण विचार आणीबाणीतल्या काळातील शिकवण मला अत्यंत भावलेली विचारसरणी होय. त्यांनी लोकांना दया,अहिंसा,पुरस्कार सेवा,समता बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली.कोणी लहान नाही कोणी मोठा नाही सगळे सारखे अशी समतेची भावना संतांची लोकांच्या मनात निर्माण केली. तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी आपले कार्य केले त्याच पद्धतीने आपल्या हातून सेवा कसे करता येईल त्या पद्धतीने आपलं लक्ष केंद्रित करत आहेत.आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच पद्धतीने मोठ्या जोमाने कार्य करीत राहतील म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतोच. परंतु पुन्हा त्यांच्या सारखं कोणीतरी माझ्याच जिल्ह्यामध्ये जन्म घ्यावा आणि पुन्हा नव्याने अशा पद्धतीने कार्य करावं असं वाटतं. एवढं असून सुद्धा कशाचीही शंका तमा मनात न बाळगता ते सतत कार्य मग्न असतात असं कार्य खूप कमी स्त्रियांमध्ये आपल्याला आढळून येत असतं. ते हिरकणी जरूर आहेत, पण हिरकणी पेक्षा हिरा त्यांच्यामध्ये मला जास्त आढळून येतो कारण, यापुढे ना,भूतो ना भविष्य अशाच पद्धतीने आहे, शाहू,फुले, आंबेडकरांचा वारसा चालवणाऱ्या त्या एक वैचारिक खऱ्याखुऱ्या जादूगर आहेत,. जिजाई ही काही सामान्य स्त्री नव्हती ती लखोजीराव जाधवासारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजी सारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होती. राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते जाधव व भोसले या दोन्हीही प्रसिद्ध घराण्याची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आले होते.जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वतंत्र प्रिय होत्या. मराठा सरदाराने कितीही पराक्रम केला तरी सुलतानांच्या दरबारात त्यांचे चीज होत नाही.याचा त्याला वाईट अनुभव आला होता. निजामाशहाणे भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती. त्याचे दुःख त्यांनी पचवले होते. जिजाबाईने आता निश्चय केला होता की,त्यांचा शिवबा अशी कामगिरी चाकरी करणारा नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील. या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या. अशा पद्धतीने आता त्या आपल्या महाराष्ट्राला घडवत आहेत. म्हणून कडवट सैनिकांना सोबत घेऊन हळूहळू पराक्रम करण्यास सुरुवात केले आहे.हे फार कमी लोकांना जाणवत आहे.मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत मावळे इमानी कष्टाळू चपळ होते. काटकपणात त्यांचा हात कोणी धरत नसेल पण ते सुलतानी राजवटीचे गांजले होते.सुलतानांच्या लष्करांकडून गावेच्या गावे लुटली जात रयत पारंगदा होई. तिला कोणी वाली नसेल अशा दुखी कष्टी लोकांनी आपण काहीतरी करावी अशी शिवरायांना वाटे परंतु या काळातील दर्जेदार साहित्यिक जे आहेत त्यांना आपल्या सोबत घेऊन शिवबाची भूमिका त्या करून घेत आहेत म्हणजे यासारखी महाराष्ट्रात वैचारिक गोष्ट आपल्याला पहावयास मिळत नाही.जे पाहिले नाहीत ते त्यांचं दुर्दैव आहे. त्यांच्या या तेजस्वी वाणीला परावर नाही.त्याच गडावरती मी एक सेवक आहे. घोडदोड करण्याचा एक वैचारिक वैकल्पिक चातुर्य मी माझ्याकडे बंदिस्त करून ठेवला आहे. समाजात वैचारिक जरा बसवली तर ते नक्की आशादायक ठरेल. म्हणून कवयित्री संध्याराणी कोल्हे यांना शब्दप्रभू अशी उपाधी सर्व साहित्यिक याच्या वतीने त्यांना बहाल करतो.

लेखक/चौफेर कवी
सुरज अंगुले
जळकोट (छ. संभाजी नगर)
ता.तुळजापूर
मो.७७१९८७६३१३,७३८५३७६३६३
ई-मेल-surajangule1991@gmail.co.

प्रतिक्रिया व्यक्त करा