जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यावर बोलण्याची रूपेश पावसकर यांची पात्रता नाही….

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यावर बोलण्याची रूपेश पावसकर यांची पात्रता नाही….

राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी

सावंतवाडी
जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यावर बोलण्याची नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या रूपेश पावसकर यांची पात्रता नाही. जिल्हाध्यक्षांवर केलेले आरोप हे राजकीय अकसापोटी असुन पद नसल्याने पावसकर सैरभैर झाले होते. पदाच्या हव्यासापोटी त्यांनी सेनेत प्रवेश केला असून तिथेही पद न मिळाल्यास पुन्हा पक्ष त्याग करतील. स्वत: कार्यक्षम नसल्याने कुडाळ तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर ते टीका करत आहेत. तर कोण कोणत्या पक्षाच काम करतं हे जनतेला चांगलेच ठावूक आहे. त्यामुळे पावसकरांच्या सर्टफिकीटची आम्हाला गरज नाही. दरम्यान, ज्या पक्षात त्यांनी प्रवेश केला, तो पक्ष राष्ट्रवादीचा मित्रपक्ष आहे. राज्यात आमची एकत्रित सत्ता आहे. याचहि भान त्यांनी बाळगावं, आणि टीका करावी. तर गेल्या वर्षभरात राष्ट्रवादीपक्ष जिल्ह्यात उभारी घेत असलेले पाहून काहींच्या पोटात पोटशूळ उठलाय, असा हल्लाबोलहि राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केलाय. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रूपेश पावसकर यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्हाध्यक्षांवर केलेल्या टीकेचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा