You are currently viewing वेंगुर्ला येथील दत्तभक्त शरद पुराणिक यांचे निधन

वेंगुर्ला येथील दत्तभक्त शरद पुराणिक यांचे निधन

वेंगुर्ला

वेंगुर्ला-कुबलवाडा येथील ओमकार मंगल कार्यालयाचे मालक तसेच ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक दत्तभक्त शरद रामचंद्र पुराणिक (७२) यांचे ५ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. वेंगुर्ला-कुबलवाडा येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्याने स्थापित केलेल्या राम मारुती मंदिरचे ते पुजारी होते.

शरद पुराणिक यांनी नर्मदा परिक्रमा यशस्वी पूर्ण केली होती. ते दत्तभक्त असल्याने श्री दत्त क्षेत्र गाणगापूर व माणगाव येथे त्यांचे वास्तव्य असायचे. त्यांनी बांधकाम व्यवसाय करताना अनेक दत्त मंदिर क्षेत्रातही व अनेक मंदिराची बांधकामे पूर्ण केली होती.

त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, पुतणे, नात, नातू असा परिवार आहे निवृत्त शिक्षक विजय पुराणिक व यवतमाळ येथील वन विभागाचे विभागीय अधिकारी सुभाष पुराणिक यांचे ते भाऊ होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − eight =