You are currently viewing स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनी हिंदुमहासभेचा मेळावा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनी हिंदुमहासभेचा मेळावा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५७ व्या आत्मार्पण दिनानिमित्त अखिल भारतीय हिंदुु महासभेच्या वतीने सावरकर भक्तांचा मेेळावा आयोजित कऱण्यात आला आहे. हा मेळावा रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत पाटील मारुती मंदिर सभागृह, न. चिं. केळकर मार्ग, वीर कोतवाल अुद्यानाजवळ, दादर (पश्चिम) येथे होईल. भाजपा काँग्रेसच्या वाटेवर या विषय़ावर यावेळी अधिवक्ता सतीश देशपांडे यांचे व्याख्यान होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश भोगले असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून अनुप केणी यांची उपस्थिती असेल. अधिकाधिक सावरकरभक्तांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + eight =