You are currently viewing पाट हायस्कूलच्या ४ खेळाडूंची राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेसाठी निवड..

पाट हायस्कूलच्या ४ खेळाडूंची राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेसाठी निवड..

चालू शैक्षणीक वर्षात क्रिडा विभागात पाट हायस्कूलचा डंका

वेंगुर्ला

दि. १५ ते १८ डिसेंबर या कालवधीत लातूर येथे होत असलेल्या किशोर/किशोरी गट राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेसाठी पाट हायस्कूलच्या ४ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. कु. भावेश नीळकंठ शिरोडकर, कु. चंदना रामदास मराळ, कु. अश्विनी विजय मलणकर व कु. रिया पालकर या ४ खेळाडूंनी राज्यस्तरावर मजल मारुन पाट हायस्कूलचे नाव उज्ज्वल केले आहे.

या खेळाडूंना पाट हायस्कूलचे क्रिडा शिक्षक श्री राजीव हंजनकर, श्री एस एन पवार, श्री डी ये कुबल व पाट गावचे रहिवासी राज्यस्तरीय कब्बडी पंच श्री दाजी रेडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विशेष म्हणजे या वर्षी क्रिडा शिक्षक श्री राजीव हंजनकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली इतर क्रिडा प्रकारातही पाट हायस्कूलने चमकदार कामगिरी केली आहे.

यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी संस्था अध्यक्ष श्री डी ये सामंत, कार्याध्यक्ष श्री समाधान परब व सचिव श्री सुधीर ठाकूर यांनी शुभेच्या दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 15 =