You are currently viewing हेवेदावे विसरून निवडणूक पार पाडा

हेवेदावे विसरून निवडणूक पार पाडा

उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांचे आवाहन

कणकवली

आदर्श आचार संहिताचे पालन करा. आपअपसातले हेवेदावे विसरून निवडणूक पार पाडा. असे प्रतिपादन कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी केले. ते कासार्डे येथे आयोजित केलेल्या आदर्श आचारसंहिता बाबत मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी पोलिस निरिक्षक सचिन हूंदळेकर, पोलीस उपनिरीक्षक सागर खंडागळे, कासार्डे बीट अंमलदार चंद्रकांत झोरे, कासार्डे विद्यालयाचे पर्यवेक्षक एन. सी. कुचेकर आदी उपस्थित होते. यावेळी कासार्डे, तळेरे, ओझरम, दारुम या गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलिस निरिक्षक सचिन हूंदळेकर म्हणाले की, राजकारण हे निवडणुकी पुरते ठेवा. गावात शांतता असू द्या. प्रशासनास सहकार्य करून वादविवाद न करता निवडणूक होऊ द्या.

या कार्यक्रमाचे आयोजन कासार्डे पोलिस पाटिल महेंद्र देवरूखकर, दारुम पोलिस पाटिल संजय बिळसकर, यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल जमदाडे यांनी तर राजेश माळवदे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा