You are currently viewing महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराकरिता इच्छुक व्यक्ती व संस्थानी अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराकरिता इच्छुक व्यक्ती व संस्थानी अर्ज करण्याचे आवाहन

 –   सहायक आयुक्त समाज कल्याण -दीपक घाटे

सिंधुदुर्गनगरी

वीरशेव-लिंगायत समाजासाठी समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकारी व साहित्यिक सरसावून पुढे यावेत याकरिता व्यक्तींसाठी एक व सामाजिक संस्थांसाठी एक असे एकुण दोन महात्मा बसेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार देण्यात येणार आहेत. तरी  या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थानी  22 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.

            सन 2018 -19,2019-20,2020-21 व 2021-22  या चार वर्षाचा एकत्रित घेण्यात येणार असल्याने सर्व व्यक्ती व संस्था यांनी चार वर्षासाठी चार वेगवेगळे रितसर अर्ज करण्यात यावेत. तसेच या अर्जाची अंतिम  दिनांक 22 एप्रिल 2022  रोजी असल्याने, इच्छुक संस्था व व्यक्ती यानी सन  2018-19,2019-20,2020-21 व 2021-22 अशा चार वर्षासाठी दोन वेगवेगळे अर्ज संबंधित  जिल्ह्याच्या सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयकडे दि 20 एप्रिल 2022 पर्यंत सादर करावेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =