You are currently viewing शिवजयंतीनिमित्त रंगले कविसंमेलन

शिवजयंतीनिमित्त रंगले कविसंमेलन

*शिवजयंतीनिमित्त रंगले कविसंमेलन*

पुणे

साहित्यसम्राट पुणे ही संस्था मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रमांद्वारे अनेक ठिकाणी कवी संमेलनाचे आयोजन करत असते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी १८२ वे कवी संमेलन निळकंठेश्वर शिव मंदिर हडपसर येथे शिवजयंती निमित्त आयोजित केले होते.
यावेळी कविसंमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी मेघराज पाटील होते. पाटील म्हणाले की मी अहिराणी पण साहित्य सम्राट संस्थेने मला अनेक वर्षापासून हे हक्काचे विचारपीठ दिले आहे. या संस्थेत हिंदी, मराठी, उर्दू ख्रिस्ती साहित्यिकांसोबत कोकणी, वैदर्भी, अहिराणी आणि इतर भाषांचेही मोठ्या आनंदानें स्वागत होत असते.
श्री निळकंठेश्वर मंदिराच्या प्रांगणात अनेक वेगवेगळ्या विषयांच्या बहारदार रचना सादर झाल्या. यामध्ये मेघराज पाटील, विनोद अष्टुळ, सौ.चंदा वाडकर, राहूल भोसले, जयश्री भोसले, नानाभाऊ माळी, सुभाष बडधे महाराज, गौरव नेवसे, बबन धूमाळ, ॲड.उमाकांत अदमाने, विठ्ठल कुलकर्णी, सूर्यकांत नामुगडे, किशोर टिळेकर, रामदास शेळके आणि इतर कवी कवयित्री यांनी मंदिरातील शिवभक्त आणि काव्यरसिक यांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद अष्टुळ, उत्कृष्ट सूत्रसंचालन आदमाने आणि कार्यक्रमाचे आभार नानाभाऊ माळी यांनी अहिराणी भाषेत व्यक्त केले.

संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा