You are currently viewing ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या फोन नंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांची तहसीलदार रामदास झळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र सडुरेला भेट

ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या फोन नंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांची तहसीलदार रामदास झळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र सडुरेला भेट

घर टू घर आरोग्य तपासणी सर्वे करण्याचे दिले आरोग्य यंत्रणेला आदेश

वैभववाडी

05 मे 2021 रोजी सकाळी ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र च्या समस्यांबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांचे फोनवरून लक्ष वेधले होते. कंटेनमेंट झोन बाबत ग्रामपंचायतीला विश्वासात घ्यावं नंतर झोन जाहीर करावे, घर टू घर सर्वे करण्यात यावा याबाबत तसेच रुग्णवाहिका देणेबाबत काळे यांनी फोनवरून संवाद साधला होता.
या पार्श्वभूमीवर ती दुपारच्या सत्रा नंतर वैभववाडी तालुक्याचे तहसीलदार रामदास झळके साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे येथे भेट दिली. व आरोग्य यंत्रणेला घर टू घर आरोग्य सर्वे करण्यासाठी चे आदेश दिले, गावातील कोरोना रुग्णसंख्या वाढीबाबत चा आढावा घेत कोणकोणत्या भागात कंटेनमेंट झोन जाहीर करता येईल यावर स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली. त्यामुळे आता गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण कमी होतील अश्या अनुषंगाने आरोग्य विभाग घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी सर्वे करणार आहेत. या आरोग्य तपासणी करत असताना ग्रामपंचायती मधून आवश्यक ते साहित्य आरोग्य यंत्रणेला पुरवण्यात येणार आहेत. तसेच संपूर्ण गावामध्ये सॅनीटायझर फवारणी देखील होणार असल्याची माहिती सडूरे शिराळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रशांत जाधव यांनी दिली. लवकरच हे साहित्य आरोग्य यंत्रणेला सुपूर्द करण्यात येईल.
यावेळी उपस्थित वैभववाडी तालुक्याचे तहसीलदार रामदास झळके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, सुपरवायझर एकावडे, उपकेंद्राच्या आरोग्यसेविका शीतल चाफे, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 13 =