You are currently viewing ख्रिसमस आणि वर्ष अखेरच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहावे

ख्रिसमस आणि वर्ष अखेरच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहावे

पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या सागर सुरक्षारक्षक व पर्यवेक्षक यांना सूचना

मालवण

ख्रिसमस आणि वर्ष अखेरच्या पार्श्वभूमीवर मालवणात पर्यटक मोठ्या प्रमाणावर दाखल होणार आहेत. या काळात कायदा, सुवस्था अबाधित राखण्या बरोबरच किनारपट्टी भागात संशयास्पद हालचाली आढळून आल्यास सतर्क राहावे, अशा सूचना मालवणचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी सागरी सुरक्षा रक्षकांना तसेच पर्यवेक्षकांना दिल्या.

मालवण पोलीस ठाण्यात आज सायंकाळी किनारपट्टी भागातील सर्व सागरसुरक्षा रक्षक, पर्यवेक्षक यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्यासह दीपेश मायबा, सागर परब, दिवाकर जुवाटकर, शिवराम माणगावकर, चंद्रकांत कुबल, रोहन खराडे, प्रभाकर रेवंडकर यांच्यासह अन्य सागरसुरक्षा रक्षक, पर्यवेक्षक यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

येत्या काळात ख्रिसमस सण, इयर ऐडिंग सुटी काळात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होणार आहेत. पर्यटकांची जास्त पसंती ही किनारपट्टी भागास असल्याने संपूर्ण किनारपट्टी ही पर्यटकांनी गजबजून जाते. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना येथील समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने बुडण्याच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर सागरसुरक्षा रक्षकांनी सतर्क राहावे. याचबरोबर या काळात समुद्रात संशयास्पद हालचाली आढळून आल्यास संबंधितांनी तत्काळ टोल फ्री क्रमांक १०९३ वर याची माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री. यादव यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा