You are currently viewing सावंतवाडी बस स्थानक आगारातील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना

सावंतवाडी बस स्थानक आगारातील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना

गणेश चतुर्थी तोंडावर आलेली असताना देखील सावंतवाडी बस स्थानक परिसरातील रस्ते खड्डेमय झाल्यानं व प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी चांगलेच आक्रमक झाले होते. या संदर्भात आगार प्रमुख बोधे यांना त्यांनी खडेबोल सुनावले होते. तर ४ दिवसांत काम न झाल्यास या खड्ड्यात वृक्षारोपण करणार असल्याचा इशारा दिला होता.

दरम्यान, याची दखल विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी घेत तातडीनं कार्यवाहीच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. इंजिनिअर अक्षय केकरे यांना या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. केकरे यांनी सोमवारी सावंतवाडी बसस्थानकास भेट दिली. यावेळी बसस्थानकावर पडलेले खड्डे, प्रवाशांची होणारी गैरसोय येत्या चार दिवसांत दुर करणार असल्याचे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले. प्रवासी तसेच गणपतीत येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी देखील श्री. दळवी यांनी यावेळी केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, इफ्तेकार राजगुरू आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा