You are currently viewing उद्या सावंतवाडीत लोकमान्य मल्टिपर्पजच्या क्षेत्रीय कार्यालयात स्नेह सोहळा 

उद्या सावंतवाडीत लोकमान्य मल्टिपर्पजच्या क्षेत्रीय कार्यालयात स्नेह सोहळा 

सावंतवाडी :

लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लि. या बँकेच्या सावंतवाडी क्षेत्रीय कार्यालयाने १४ वर्ष पूर्ण केल्याबद्दल लोकमान्य सावंतवाडी येथील क्षेत्रीय कार्यालयात ग्राहक व हितचिंतकांचा स्नेह सोहळा व सत्यनारायण महापुजा आयोजित केले आहे.

लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटी लि. १४ वर्षांच्या या प्रवासात बरीच शिखरे पार केलेली आहेत. आपल्या आशीर्वादाच्या बळावर सुवर्ण भविष्याप्रती मार्गस्थ होण्याचा मानस आहे.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी (IAS), युवराज श्रीमंत लखमराजे खेमसावंत भोंसले, लोकमान्यचे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर उपस्थित राहणार आहेत.

१० डिसेंबरला सायंकाळी ५ ते रात्री ९.०० या वेळेत राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या पटांगण येथे ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संगीतमय दर्शनाचा विषेश कार्यक्रम होणार आहे.

तर लोकमान्यच्या रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी येथील शाखेत सत्यनारायण महापुजा आयोजित करण्यात आले आहे. या विशेष मेळाव्यास लोकमान्य वर भरभरून प्रेम करणाऱ्या हितचिंतक व ग्राहकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे लोकमान्य मल्टीपर्पज बँकेकडून करण्यात आलं आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =