You are currently viewing ‘तहात मिळविलेल्या विजयापेक्षा शत्रुशी कडवी झुंज देत मिळविलेल्या विजयातील आनंद वेगळाच’

‘तहात मिळविलेल्या विजयापेक्षा शत्रुशी कडवी झुंज देत मिळविलेल्या विजयातील आनंद वेगळाच’

१००% गुण मिळवत वैभववाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात संयुक्त प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या सृष्टी हांडे हिने व्यक्त केल्या भावना

डॉक्टर होऊन रुग्ण सेवा करण्याचा सृष्टीचा निश्चय

काल सायंकाळ नंतर एस.एस.सी.परीक्षेचा निकाल शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील सर्वच शाळांमधील परीक्षेस प्रविष्ट झालेले विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
वैभववाडी तालुक्यातील निकाल पाहता अर्जुन रावराणे विद्यालयात शिकणारी कु.सृष्टी लक्ष्मण हांडे. या विद्यार्थीनीने एस.एस.सी परिक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवत वैभववाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात संयुक्त प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
या उज्वल यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत असताना सृष्टीने मात्र हा निकाल आपल्यासाठी “कभी खुशी,कभी गम” अशा स्वरूपाचा असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. ‘तहात मिळालेल्या विजयापेक्षा शत्रुशी कडवी झुंज देत मिळविलेल्या विजयातील आनंद वेगळाच असतो.’ अशा भावना तिने याप्रसंगी व्यक्त केल्या आहेत.
संपूर्ण राज्यात कोरोनामुळे शाळा बंद असताना देखील माझ्या शाळेने आमचे वर्ग शिक्षक चोरगे सर यांनी वैभववाडी तालुक्यात प्रथम व्हॉट्स ॲप,गुगल मिट यांसारख्या माध्यमातून आमचे ऑनलाईन वर्ग सुरू केले होते. याशिवाय प्रशालेचे परीक्षा विभाग प्रमुख शिंदे सर यांनी परीक्षा विभागामार्फत आमच्या पाठ्यपुस्तकातील २-३ प्रकरणांवर आधारित अशा जवळपास पाच ते सहा सराव परीक्षा त्यानंतर एस.एस.सी बोर्डे परीक्षा पद्धतीनुसार पुर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय इतर गृहपाठ अश्या उत्तम रीतीने आमची तयारी प्रशालेतील सर्व विषय शिक्षकांनी करून घेतली होती.याशिवाय शाळेचे संस्था अधिक्षक जयेंद्र रावराणे सर यांचे आम्हाला अधुनमधून मार्गदर्शन व्हायचे त्यांचे विचार आजही मला प्रोत्साहन देतात.
आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर सर तसेच मला पाचवी पासून मार्गदर्शन करणारे माझे शिक्षक पवार सर ,तुळसणकर सर, सुर्यवंशी सर, सावंत सर, मरळकर सर तसेच शिक्षिका केळकर मॅडम, पाटील मॅडम, सावंत मॅडम, भोसले मॅडम, बोडेकर मॅडम,भोवड मॅडम, परिट मॅडम, सबनिस मॅडम, राणे मॅडम.,गांगुर्डे मॅडम या सर्वांची मी ऋणी त्यांचा माझ्या गुणवत्तेवरील विश्वासाचं मला अभ्यासासाठी नेहमीच प्रोत्साहन देतो. यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी देखील सर्व विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम रीतीने अभ्यास करून चांगले यश मिळवावे. ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली मोबाईलचा अतिवापर टाळून स्वयं अध्ययन करावे असा सल्ला देखील तिने आपल्या प्रशालेतील यंदा दहावीच्या वर्गात शिकत असणाऱ्या मित्र मैत्रिणींना दिला आहे.
माझ्या या यशामध्ये शिक्षकांबरोबरचं माझ्या आई- वडीलांचे व बहिण- भाऊ तसेच मित्र – मैत्रीणींचा देखील मोलाचा वाटा असल्याचे तिने सांगितले आहे. अभ्यासा बरोबरचं माझी आवड , छंद जोपासण्यासाठी त्यांनी नेहमीच मला सहकार्य केले असं मत सृष्टीने यावेळी व्यक्त केले आहे.रोहीणी भाजीभाकरे यांच्यापासून प्रेरणा मिळाली असल्याचे ती सांगते. आपण जिल्हाधिकारी व्हायचं असा निश्चय अगदी लहानपणापासून तिने केला होता. मात्र कोरोना काळात राज्यात नागरिकांची झालेली हेळसांड व विटंबना पाहून आपल्या मुलीने डॉक्टर होऊन रुग्णसेवा करावी असे तिच्या वडिलांना वाटंत आपल्या वडीलांचे प्रथम स्वप्न साकार करण्याचे तिने ठरविले आहे.त्यासाठी सध्या तीने निट परीक्षेचा अभ्यास देखील करण्यात सुरवात केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + four =