You are currently viewing सावंतवाडी तालुक्यात सरपंचपदांकरिता १२५ तर सदस्य पदासाठी ६४८ उमेदवार रिंगणात

सावंतवाडी तालुक्यात सरपंचपदांकरिता १२५ तर सदस्य पदासाठी ६४८ उमेदवार रिंगणात

सावंतवाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीस रणसंग्राम सुरू झाला असून ५२ ग्रामपंचायती निवडणुका होऊ घातल्या आहेत. यापैकी तीन ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये सरपंच पदासाठी १८५ पैकी ५३ आपली अर्ज मागे घेतले आहेत तर ९१४ पैकी १५३ सदस्यांनी अर्ज मागे घेतले आहे तरीही अर्ज दुबार झाला आहे.

आता ५२ ग्रामपंचायतीसाठी १३२ पैकी सरपंच पदासाठी १२५ रिंगणात असून ७६० पैकी ६४८ सदस्य रिंगणात आहेत. ११२ सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून ७ सरपंच बिनविरोध निवडून आलेत. यात आजगाव, गेळे, कुडतरकर टेंब सावरवाड, नेतर्डे, सातोसे, तांबुळी, वाफोली सरपंच बिनविरोध निवड झाली तर गेळे, कुडतडकर टेंब सावरवाड, नेतर्डे ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. या निवडणुकीचे मतदान १८ डिसेंबर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तर मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार असून आज पासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा