You are currently viewing खा.नारायणराव राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज होणार कुडाळ मंडल कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचा समारोप….

खा.नारायणराव राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज होणार कुडाळ मंडल कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचा समारोप….

कुडाळ

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आयोजित कुडाळ मंडल व ओरोस मंडल यांच्यासाठीचे संयुक्त कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आज पूर्ण होत आहे. गुरुवार दिनांक २६ आणि शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२० रोजी होत असलेल्या या शिबिराचा समारोप आज भाजपा नेते माजी मुख्यमंत्री आणि सन्माननीय खासदार श्री नारायणराव राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे वासुदेवानंद ट्रेड सेंटरच्या भव्य सभागृहात होणार आहे.सकाळी ९.३० ते संध्याकाळी ४.३० पर्यंत या वेळेत गेले दोन दिवस हे कार्यकर्ता प्रशिक्षण सुरू आहे.

काल सभागृहात या प्रशिक्षण वर्गाचा थाटात शुभारंभ झाला. आज या कार्यक्रमाचा समारोप सन्माननीय खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या उपस्थितीत होणार असून या प्रशिक्षण वर्गात सहभागी होणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना सन्माननीय राणे साहेब यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली यांच्यासह माजी आमदार प्रमोदजी जठार व अन्य प्रमुख भाजपा पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

काल या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा बँकेचे संचालक श्री.अतुल काळसेकर, भाजपचे जेष्ठ नेते श्री.राजू राऊळ, जिल्हा संघटन सेक्रेटरी श्री. प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष श्री.रणजित देसाई, महिला जिल्हाध्यक्ष सौ.संध्या तेरसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. भाई सावंत, श्री.चारुदत्त देसाई, श्री.निलेश तेंडोलकर, श्री. मोहन सावंत, कुडाळ सभापती सौ. नूतन आईर, कुडाळ नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली,जिल्हा चिटणीस श्री. संजय वेंगुर्लेकर, माजी सभापती श्री.बंड्या मांडकूलकर, श्री. किशोर मर्गज, श्री.अभय परब जिल्हा चिटनिस श्री.बंड्या सावंत, कुडाळ मंडल अध्यक्ष श्री.विनायक राणे, ओरोस मंडल अध्यक्ष श्री.गोपाळ हरमलकर, जिल्हा मोर्चा प्रवक्ता श्री.दादा साईल, युवा मोर्चा तालुअध्यक्ष श्री.पप्या तवटे, महिला मोर्चा अध्यक्ष सौ.आरती पाटील,  तालुका सरचिटणीस श्री.विजय कांबळी, श्री.देवेंद्र सामंत, श्री.राजा प्रभू, श्री.योगेश बेळणेकर, उपाध्यक्ष श्री.राजा धुरी इत्यादींच्या उपस्थित दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला.

आजच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये श्री.अतुल काळसेकर यांनी आत्मनिर्भर भारत या विषयावर सत्र घेतले. श्री.प्रभाकर सावंत यांचे “आपला विचार आपला परिवार” या विषयावर सत्र होते. भाजपा सोशल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य श्री.अविनाश पराडकर यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर” या विषयावर उद्बोधक सत्र घेतले आणि श्री.विलास हडकर यांनी गेल्या सहा वर्षात अंत्योदयसाठी झालेले प्रयत्न या विषयावर अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी मार्गदर्शन उपस्थित प्रशिक्षणार्थींना केले.

आज संध्याकाळी ४.३० वाजता या दोन दिवसीय प्रशिक्षणाचा समारोप होत असून तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष श्री.राजन तेली, श्री.प्रमोद रावराणे, श्री.अजित गोगटे, श्री.मिलिंद कुलकर्णी, श्री.प्रमोद जठार आदी मान्यवरांची विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्रे होणार आहेत.संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे होणार असून कुडाळ मंडलासह सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रशिक्षण शिबिरे पूर्ण करण्यात आघाडी घेतली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + five =