You are currently viewing सिंधुदुर्गातील गौण खनिज व्यावसायिकांना गोव्याच्या सीमा अखेर खुल्या!

सिंधुदुर्गातील गौण खनिज व्यावसायिकांना गोव्याच्या सीमा अखेर खुल्या!

माजी खा. निलेश राणे यांची गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गौण खनिज वाहतूकी साठी गोवा सरकारने लादलेल्या जाचक अटींमुळे गेले सहा दिवस बंद असलेली सिंधुदुर्ग ते गोवा गौण खनिज वाहतूक शनिवार पासून पूर्ववत सुरु होत आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी विनायक निलेश राणे यांनी या संदर्भात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर या जाचक अटी शिथील करण्यात आल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दररोज गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज वाहतूक केली जाते. यामध्ये वाळू, चिरे, खडीचा समावेश आहे. मात्र अलीकडे गोवा सरकारने गौण खनिज वाहतुकी साठी मोठ्या प्रमाणात अटी शर्ती लावल्या होत्या. त्यांची पूर्तता करणे सर्वसामान्य डंपर आणि वाळू व्यावसायिकांसाठी त्रासदायक आणि वेळकाढूपणाचे होते. त्यामुळे मागील सहा दिवसांपासून सिंधुदुर्ग ते गोवा खनिज वाहतूक बंद होती. जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी सदरील बाब माजी खासदार निलेश राणे यांच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर श्री. राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे या अटी शर्ती शिथील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शनिवार पासून सिंधुदुर्ग ते गोवा गौण खनिज वाहतूक पुन्हा सुरु होत आहे. याबाबत जिल्ह्यातील खनिज व्यावसायिक आणि डंपर व्यावसायिकांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि माजी खासदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 2 =