You are currently viewing चक्कर आल्याने फळ विक्रेता थेट मोती तलावाच्या सांडव्यात कोसळला…

चक्कर आल्याने फळ विक्रेता थेट मोती तलावाच्या सांडव्यात कोसळला…

परिसरातील नागरिकांकडून मदत कार्य…

सावंतवाडी

चक्कर आल्यामुळे आठवडा बाजारात आलेला फळ विक्रेता थेट मोती तलावाच्या सांडव्यात कोसळून गंभीर जखमी झाला. ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास चिटणीस नाका परिसरात घडली.अब्दुल रझाक (५५) रा. बाहेरचावाडा, असे त्यांचे नाव आहे. दरम्यान परिसरातील नागरिकांनी त्यांना बाहेर काढून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून रवी जाधव यांनी सुद्धा मदत कार्यात पुढाकार घेतला.

याबाबत अधिक माहिती अशी की, चिटणीस नाका परिसरात मोती तलावाच्या सांडव्याजवळ संबंधित विक्रेत्याने फळ विक्रीचा स्टॉल लावला होता. यावेळी त्यांना अचानक चक्कर आल्याने ते थेट सहा ते सात फूट खोल सांडव्यात कोसळले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान परिसरातील नागरिकांनी धावा-धाव करत त्यांना बाहेर काढले व उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णायात दाखल केले. तर अधिक उपचारासाठी त्यांना गोवा-बांबूळी येथे हलविण्यात आले आहे. याबाबतची माहिती श्री. जाधव यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा