You are currently viewing देवगड महाविद्यालयाच्या प्रतीक घाडीगांवकर नॅशनल शूटिंग चॅम्पियन स्पर्धेत दर्जेदार कामगिरी

देवगड महाविद्यालयाच्या प्रतीक घाडीगांवकर नॅशनल शूटिंग चॅम्पियन स्पर्धेत दर्जेदार कामगिरी

कोल्हापूर ग्रुपचे प्रतिनिधित्व करताना भारतीय संघ निवड चाचणीसाठी झाली निवड

देवगड

६५व्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये देवगड महाविद्यालय एन.सी.सी विभागाचा सिनियर अंडर ऑफिसर प्रतिक घाडीगांवकर दर्जेदार कामगिरी करत भारतीय संघाच्या निवड चाचणीसाठी पात्र ठरला आहे. सदर रायफल शूटिंग स्पर्धा २० नोव्हेंबर पासून ९ डिसेंबर पर्यंत केरळ मधील तिरुवनंतपरम येथील वट्टीयुरकावू या शूटिंग रेंजवर सुरू आहेत. प्रतिक एनसीसी च्या ५८ महा. बटालियनकडून खेळत असून कोल्हापूर ग्रुपचे प्रतिनिधीत्व करीत आहे. नेमबाजीच्या पीप साईट ५० मीटर रायफल (प्रोन) या प्रकारातील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे तो निवड चाचणीसाठी पात्र ठरला आहे. त्याने स्पर्धेमध्ये ६००.१ गुण मिळवून निवड फेरी गाठली आहे. त्याला देवगड महाविद्यालायाकडून आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य मिळत आहे. तसेच ५८ महा. बटालियनकडून त्याला नेमबाजी प्रशिक्षणासाठी सर्व स्टाफ आणि कमांडिंग ऑफिसर, ॲडम ऑफिसर यांचेही मार्गदर्शन लाभले. संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्राचार्या, एन.सी.सी ऑफिसर, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गाकडून प्रतिकचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा